आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत म्हणाले- संघ 3 दिवसांत सैनिक तयार करु शकतो, \'सैनिकांचा अपमान, माफी मागा\' -काँग्रेस-NCP

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याने त्यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी, आपने टीका केली आहे. - Divya Marathi
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याने त्यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी, आपने टीका केली आहे.

मुझफ्फरपुर - एक सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला 6 ते 7 महिने लागतात, संघ 3 दिवसात जवान तयार करु शकतो. ही आमची क्षमता आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यवर आपसह राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. भागवतांनी जवानांचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागावी अशी मागणी एनसीपी नेते नवाब मलिक यांनी केली आहे. भागवतांच्या वक्तव्यावर देशभरात टीका होत असताना संघाने स्पष्टीकरण दिले आहे. 

 

काय म्हणाले मोहन भागवत 
- रविवारी मुझफ्फरपुर येथे संघ स्वंयसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, 'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरजपडली तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. ही आमची क्षमता आहे. देशाच्या दुसऱ्या कोणत्याही संघटनेत ती नाही.'
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, भागवत म्हणाले, 'संघाचे स्वंयसेवक मातृभूमीच्या रक्षणासाठी कायम तयार असतात. ते हसत-हसत बलिदानही देऊ शकतात. कोणत्याही परिस्थितीसाठी स्वयंयसेवक तयार असतात. जेव्हा चीन हल्ला करण्याच्या तयारी होता त्यावेळी सीमारेषेवर लष्कर येईपर्यंत स्वयंसेवक तिथे उभे होते. जर चीनी सैनिय आलेच तर प्रतिकार करण्याची त्यांची तयारी होती.'

 

आप-राष्ट्रवादीची मागणी, सैनिकांची माफी मागा 

- 'हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम, वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होता' अशा शब्दात आम आदमी पार्टीने भागवतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

- भागवत यांच्या वक्तव्यावर आम आदमी पार्टीने जोरदार टीका केली आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह ट्विट करुन त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'हेच वक्तव्य दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीने केले असते तर भाजपने त्यांना आतापर्यंत पाकिस्तानात पाठवले असते.'
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नवाब मलिक म्हणाले, 'हा सैनिकांचा अपमान आहे. भागवतांनी भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे.' 

 

काँग्रेस-हार्दिक पटेल यांनी घेतला भागवतांच्या वक्तव्याचा समाचार 

काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी ट्विट करुन भागवतांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ट्विटमध्ये म्हटले, 'आम्ही जेव्हा इंग्रजांशी लढत होतो तेव्हा तुमचे संघटन लपून बसले होते. सीमेवर जवान शहीद होत आहेत आमि तुम्ही त्यांचा अपमान करता. पंतप्रधान चुकीचे आहेत ते पुरेसे आहे.'
- दुसरीकडे, हार्दिक पटेल यांनी ट्विटवर म्हटले आहे, की संघप्रमुखांनी आता आमच्या लष्करावर शंका उपस्थित केली आहे. लष्कराला कमी लेखणारे मोहन भागवत यांच्याकडून राष्ट्रभक्त कोणाला शिकायची आहे. लष्कराचा अपमान करणाऱ्या भागवतांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.'  

बातम्या आणखी आहेत...