आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमध्ये सलमानला VIP ट्रिटमेंट पाहून आसाराम भडकला, म्हटले- मला नाही आले कधी भेटायला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी जोधपूर तुरुंगातील हा फोटो बाहेर आला होता, त्यावरुन आता प्रश्न उपस्थित होत आहेत. - Divya Marathi
गुरुवारी जोधपूर तुरुंगातील हा फोटो बाहेर आला होता, त्यावरुन आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणी दोषी सलमान खान दोन दिवसांपासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. सलमान तुरुंगात असला तरी त्याच्या लाइफस्टाइलमध्ये कोणताही बदल दिसलेला नाही. त्याने तुरुंगाचे जेवण घेतलेले नाही किंवा कैद्यांचे कपडेही घातलेले नाहीत. दोन्ही गुरुवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस तो जिन्स आणि टी-शर्टमध्ये होता. प्रिती झिंटा, बहीणींनी सलमानची भेट घेतली. जेलच्या स्टाफने ऑटोग्राफसाठी त्याच्याभोवती गर्दी केली होती. हे सर्व पाहून बलात्काराच्या आरोपात याच तुरुंगात असलेला आसारामचा तिळपापड झाला. तो तुरुंगातील पोलिसांना म्हणाला, माझी कधी अशी विचारपूस केली नाही. 

 

मच्छरांनी सलमानला एकटे पडू दिले नाही
- सलमानची तुरुगांतील पहिली रात्र मोठी कठीण होती. शुक्रवारी जामीन मंजूर होईल की नाही, या चिंतेत त्याने अनेक सिगारेट ओढल्या. रात्रभर त्याच्या बराकीच्या बाहेर पंखे लावलेले होते. बराकीत सलमान एकटा असला तरी मच्छरांनी त्याला सोबत केली. आधीच उद्या काय होईल, या चिंतेने डोळा लागत नसलेल्या सलमानला मच्छरांनीही झोपू दिले नाही. उशिरा रात्री मच्छरांपासून बचाव करणारी ट्यूब लावल्यानंतर सलमानला झोप लागली.
- शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर सलमानला  तुरुंगातील चने आणि चहा ऑफर झाली, त्याला त्याने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गुपचूप पद्धतीने बाहरुन ब्लॅक कॉफी आणि आलेले जेवण त्याने घेतले. 

 

प्रिती झिंटाने 30 मिनिट केली चर्चा 
- सलमानची मैत्रिण आणि अभिनेत्री प्रिती झिंटा शुक्रवारी त्याच्या भेटीसाठी जोधपूरला आली. प्रिती विमानतळावरुन थेट तुरुंगात पोहोचली. दोघांनी जवळपास अर्धातास चर्चा केली. त्यानंतर सलमानची बहीण अलवीरा आणि अर्पिता आल्या. त्यांच्यासोबतही त्याने गप्पा केल्या. यावेळी बॉडीगार्ड शेराही उपस्थित होता. 

 

आसाराम ओरडला - मला भेटायला नाही आले कधी 
- तुरुंगातील पोलिस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांनी सलमानच्या बराकीपुढे ऑटोग्राफसाठी गर्दी केली होती. शेजारच्या कोठडीत असलेला बलात्काराचा आरोपी आसाराम याचा हे सर्व पाहून तिळपापड झाला. तो तुरुंगाच्या कर्मचाऱ्यांवर ओरडला, मला भेटायला कधी आले नाही, हा सेलिब्रिटी आहे तर सर्वच त्याला भेटायला येऊ लागले. 
- दुसरीकडे, जोधपूरच्या कडक उन्हात तुरुंगा बाहेर सलमानचे चाहते आणि आसाराम समर्थक उभे होते. सलमानच्या चाहत्यांना जसे कळाले की आज जामीन मिळणार नाही ते निराश झाले. 

अधिकाऱ्यांनी सलमानला 4 जणांना भेटवले 


नियम काय सांगतो: 15 दिवसांत एकवेळ, जास्तीत जास्त 3 व्यक्ती भेटू शकतात 
- तुरुंगाच्या नियमावलीप्रमाणे आठवड्यातील  सोमवार सोडून इतर सहा दिवस कैद्याला भेटण्याची परवागनगी आहे. 
- शिक्षा झालेल्या कैद्याला 15 दिवसांमध्ये एकाच जास्तीत जास्त 3 व्यक्ती भेटू शकतात. यात बदल करण्याचा अधिकार तुरुंग अधीक्षकांना असतो. 

नियम बाजूला ठेवत अनेकांना भेटण्याची परवानगी 
- तुरुंग प्रशासनाने पहिल्याच दिवशी अधिकारांचा गैरवापर केल्याचे म्हटले जात आहे. अधिकृतरित्या 4 जणांना भेटण्याची परवानगी दिली. त्यामध्ये प्रिती झिंटा, अलवीरा, अर्पिता आणि शेरा यांचा समावेश होता. यावरुन इतर कैद्यांच्या नातेवाईंकामध्ये रोष दिसून आला.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सलमानचे वकील आणि शिक्षा सुनावणारे जज खत्री... 

बातम्या आणखी आहेत...