आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अटींवर सलमानला मिळाला जामीन, जोधपूर तुरुंगाबाहेर चाहत्यांचा धुडगूस, रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला काही अटींवर अखेर जामीन मंजूर झाला आहे. दोन दिवसांपासून तुरुंगात असलेल्या सलमानची आज सायंकाळी तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जोधपूर तुरुंगाबाहेर सलमानच्या चाहत्यांची गर्दी वाढली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जोधपूर पोलिसांचा मोठा फौजफाडा तुरुंगाबाहेर तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात आहे. 


या अटींवर सलमानला जामीन 
- जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सलमान खानला 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. 
- सलमानला कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही. 
- 7 मे रोजी त्याला स्वतः कोर्टात हजर राहावे लागेल. 

 

तुरुंगाबाहेर चाहत्यांचा धुडगूस 
- सलमान खानची जामीन प्रक्रिया पूर्ण होऊन सायंकाळी 6 वाजता पर्यंत तो तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. 
- तत्पूर्वी तुरुंगाबाहेर त्याचे नातेवाईक अजून आलेल नाहीत.
- सलमानला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जोधपूर मध्यवर्ती कारागृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. 
- टायगर छूट गया, सारख्या घोषणा सलमानचे चाहते देत आहेत. त्यासोबत गाणे गायले जात  आहेत. कोर्टबाहेर फुले उधळून कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. 
- चाहत्यांची संख्या वाढत आहे. सलमान बाहेर येण्यास संध्याकाळ होऊ शकते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
- दंगल रोधख वज्र सारखी वाहने आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात आहे. अश्रूधुराच्या नळकांड्याही तयार ठेवण्यात आल्या आहेत. 

 

अलवीरा-अर्पिता येणार घेण्यासाठी ? 
- सलमान खानला घेण्यासाठी त्याच्या दोन्ही बहिणी अलवीरा आणि अर्पिता येण्याची शक्यता आहे. बॉडीगार्ड शेराही जोधपूरमध्येच आहे. 

बातम्या आणखी आहेत...