आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 विद्यार्थी ठार: काहींना कडेवर- काहींना खांद्यावर उचलून वाचवले, भीषण अपघाताचे 8 फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूरपूर (कांगडा)/पठाणकोट - नूरपूरच्या वजीर रामसिंह पठानिया पब्लिक स्कूलची बस दुर्घटनाग्रस्त झाल्याने 27 जणांचा मृत्यू झाला. यात 23 विद्यार्थी (13 मुले, 10 मुली), 2 शिक्षक, एक ड्रायव्हर व एका लिफ्ट घेतलेल्या महिलेचा समावेश आहे. बसमध्ये एकूण 37 जण स्वार होते. सोमवारी 4.30 वाजता शाळा सुटल्यानंतर खासगी शाळेची ही बस मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात होती. चेली गावाजवळ अरुंद रस्त्यात एका मोटारसायकलस्वाराला साइड देताना बस अनियंत्रित झाली. आणि  200 फीट खोल दरीत कोसळली. अपघातात बस ड्रायव्हर सेवानिवृत सैनिक मदन सिंह सहित 22 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर इतरांना गंभीर अवस्थेत नूरपुर रुग्णालयात भरती करण्यात आले. 

 

असे काढले बालकांना...

> गंभीर जखमी 6 विद्यार्थ्यांवर अमनदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर 4 जखमींना नूरपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकूण 10 विद्यार्थ्यांना पठानकोटला पाठवण्यात आले होते. यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर उपस्थित लोकांनी सांगितले की, बस उलटताना एक विद्यार्थी उसळून बाहेर पडला होता. तो कसाबसा वर पोहोचला आणि त्याने आरडाओरड करून लोकांना गोळा केले. यानंतर स्थानिकांनी दरीमध्ये उतरून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. 

> मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत, अपघातग्रस्त कुटुंबांना संवेदना व्यक्त केली. यासोबतच दुर्घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थी, शिक्षक व इतरांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये भरपाईची घोषणाही केली.


बाइकला साइड दिली आणि तिथेच उलटली बस...
> रुग्णालयात भरती 5वीचा विद्यार्थी रणवीर म्हणाला की, बस जेव्हा अरुंद रस्त्यावर पोहोचली तेव्हा समोरून एक बाइकस्वार येत होता. बसने त्याला साइड दिली आणि त्यानंतर बस दरीच्या बाजूने कोसळली. बसचे दार उघडले असल्याने तो बाहेर पडला. यानंतर लाकडाचा आधार घेऊन तो वर पोहोचला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...