आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचलमध्ये स्कूल बस 200 फूट खोल दरीत कोसळली, ड्रायव्हरसह 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 15 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूरपूर - हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील नूरपूर येथे एका खासगी शाळेची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत ड्रायव्हरसह 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. बस मुलांना घरी सोडण्यासाठी शाळेतून निघाली होती. बसमध्ये 60च्या आसपास मुले होती अशी माहिती आहे.

 

बसमध्ये किती विद्यार्थी होते? 

प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये 60 मुले होती. बस 200 फूट खोल दरीत कोसळली असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

केव्हा झाला अपघात ? 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 4 वाजता हा अपघात झाला. 

 

कोणत्या शाळेची होती बस?

रामसिंह पठानिया हायस्कूलची ही बस असल्याचे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...