आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • School Teacher Attempted Rape On 6 Year Girl Student In Punjab Latest Breaking News

भरवर्गात शिक्षकाने केला 6 वर्षीय बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न, पोट दुखू लागल्याने चिमुरडी रडली म्हणून सोडून दिले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनौर (पतियाळा) - सरकारी प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता 2री मधील एका 6 वर्षीय बालिकेवर वर्गातच बलात्काराचा प्रयत्न केला. घटनेदरम्यान त्याने इतर सर्व मुलांना कॉम्प्युटर क्लासमध्ये गेम खेळण्यासाठी पाठवले. चिमुकलीने घरी गेल्यावर आईला पोटात दुखत असल्याची तक्रार केली, तेव्हा या घटनेला वाचा फुटली. आईने विचारल्यावर चिमुरडी म्हणाली- टीचरने क्लासमध्ये नेऊन आधी कपडे उतरवले आणि मग घाण काम करू लागला. पण दुखू लागल्यावर मी रडू लागले म्हणून त्यांनी सोडून दिले. ही घटना 6 जुलैची आहे.

 

पीडित कुटुंबीयांनी दिली सरपंचांना माहिती
आईवडिलांनी लगेच गावातील सरपंच सरपंच गुरमुख सिंह यांना माहिती कळवली. सरपंच गावकऱ्यांना घेऊन शाळेत गेले, तेव्हा 38 वर्षीय आरोपी शिक्षक शाळेच्या बाथरूममध्ये लपून बसला. परंतु, गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढून यथेच्छ धुलाई केली. तेव्हाच पीडित बालिकेच्या पालकांनी तक्रार दिली होती, परंतु 11 दिवसांनंतरही कोणतीही कारवाई झाली नाही, म्हणून बुधवारी पालकांनी पुन्हा पोलिसांत धाव घेतली. पीड़ित मुलीच्या पालकांनी बुधवार जुलका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354, 12 पॉस्को अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी नरिंदर सिंह म्हणाले, आरोपी शिक्षकाला लवकरच अटक केली जाईल.

 

कारवाईसाठी शाळेकडूनच चालढकल
घटनेनंतर पालकांनी गावकऱ्यांसोबत शाळेत जाऊन शिक्षकाला मारहाण केली. सरपंचाने शाळेच्या मुख्याध्यापकांना आरोपी शिक्षकाविरुद्ध कारवाईची मागणी केल्यावर बीपीईओ जोगिंदर सिंह यांनी 13 जुलै रोजी शाळेला भेट दिली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. परंतु, शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने सोमवारी पंचायतीने पुन्हा एकदा एकत्र होऊन शिक्षण विभागातून आरोपी शिक्षकाला सस्पेंड करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप कारवाई नाही.

 

एक वर्ग मुद्दाम रिकामा ठेवायचा वासनांध शिक्षक
शाळेला 3 वर्गखोल्या आहेत. एक खोली ऑफिससाठी आणि 2 खोल्यांमध्ये एकूण 5 वर्ग भरवले जायचे. घटनेच्या दिवशी शाळेचा मुख्याध्यापक डेप्युटेशनवर दुसऱ्या शाळेत गेला होता. यामुळे आरोपी सतीश सर्व मुलांना एका रूममध्येच शिकवायचा. दुसरा वर्ग रिकामा ठेवला होता. घटनेच्या आधी सर्व स्टुडेंट्सना कंप्यूटर गेम खेळण्यात व्यग्र करून ठेवले. स्कूल हेड रोशन म्हणाले की, यापूर्वीही मार्चमध्ये त्या शिक्षकाने 5व्या इयत्तेतील मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही मी डेप्युटेशनवर बाहेर होतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी photos... 

 

बातम्या आणखी आहेत...