आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे झाले होते भैय्यूजी महाराजांचे दुसरे लग्न, पाहा Wedding Album

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - अध्यात्मिक संत भैय्यूजी महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. इंदूरमध्ये राहत्या घरी भैय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच भैय्यूजी महाराज यांचे दुसरे लग्न झाले होते. त्यावेळीही सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 


भैय्यू महाराजांनी शिवपुरी येथील डॉ.आयुषीसोबत दुसरे लग्न केले होते. इंदूर येथील सिल्व्हर स्प्रिंग क्लब हाऊसमध्ये भैय्यू महाराज यांच्या दुसर्‍या लग्नाचा समारंभ झाला होता. विशेष म्हणजे भैय्यू महाराज यांनी वर्षभरापूर्वी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले होते. पण अचानक त्यांनी पुन्हा लग्न केल्याच्या बातमीने त्यांच्या अनुयायांना धक्का बसला. 


पहिल्या पत्नी माधवी यांचे निधन झाल्यानंतर भैय्यूजी महाराज एकाकी पडले होते. तसेच 85 वर्षीय आई कुमुदिनी देशमुख व 15 वर्षीय मुलगी कुहू हिची काळजी घेण्यासाठी त्यांनी दुसरा विवाह केल्याची चर्चा त्यावेळी होती. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, भैय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नाचे काही PHOTOS...

 

बातम्या आणखी आहेत...