आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलांच्या एन्काउंटरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, पोलिस चौकीवर हल्ल्याचे होते आरोपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. अधिकाऱ्यांच्या मते, सैन्याला अनंतनागच्या हकुरा परिसरात काही दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर येथे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. यादरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. सैन्याकडून झालेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात 3 दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात आणखीही दहशतवादी लपलेले असू शकतात. यासाठी सैन्याची शोधमोहीम सुरू आहे.


काश्मीरचे रहिवासी होते दहशतवादी
- वृत्तसंस्थेनुसार, चकमकीत ठार झालेले दहशतवादी काश्मीरचे रहिवासी होते. त्यांची श्रीनगरचा इसा फाजली आणि अनंतनागचा रहिवासी सय्यद ओवेसी आणि सब्जार अहमद अशी नावे आहेत.  
- पोलिसांनी घटनास्थळावरून एके-47 रायफल्स, पिस्तूल आणि ग्रेनेडसहित अनेक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
- पोलिस स्टेटमेंटनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक सौरा येथील पोलिस गार्ड पोस्टवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात सामील होता. या हल्ल्यात एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता.

 

या महिन्यात ठार झाला होता जैशचा मास्टरमाइंड वकास 
- या महिन्यात सुरक्षा दलांनी सुंजवान कँप हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुफ्ती वकासला चकमकीत ठार केले होते. वकासने 10 फेब्रुवारी रोजी 4 दहशतवाद्यांना पाठवून सुंजवान आर्मी कँपवर आत्मघाती हल्ला घडवला होता. यात 6 जवानांसह एका नागरिक शहीद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...