आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्नाव प्रकरणात आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरची सुरक्षा काढली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उन्नाव अत्याचार प्रकरणातील आरोपी व बांगरमऊचा भारतीय जनता पार्टीचा खासदार कुलदीप सिंह सेंगरची वाय श्रेणीची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने काढली आहे.  
आमदाराच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने सरकारने आमदाराची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी दिली.

 

माखी येथील निवासस्थानी दाेन कमांडोंसह ११ सुरक्षा जवान होते. त्यांना आता काढून टाकण्यात आले आहे. सीबीआयने आमदाराच्या विरोधात पाक्सो कायदाअंतर्गत ३६३, ३६६, ३७६, ५०६ एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  सेंगरला १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आमदाराच्या अटकेवरून होत असलेल्या विलंबाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती.  


सीबीआयने आमदारास सात दिवसांच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी  शनिवारी चौकशीसाठी आमदाराच्या कोठडीत वाढ करावी, अशी विनंती करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...