आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • अजब गजब: पत्नीला पुरुषांसारखी दाढी म्हणून घटस्फोटासाठी पतीची कोर्टाला विनंती Seeks Divorce Because Wife Has Beard In Ahmedabad

पत्नीला पुरुषांसारखी दाढी, आवाजही आहे पुरुषी, घटस्फोटासाठी पतीची कोर्टात धाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - अहमदाबादेत एका व्यक्तीने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. कारण- पत्नीला दाढी आहे आणि तिचा आवाजही मर्दाना आहे. लग्नाआधी त्याच्यापासून हे सर्व लपवून ठेवण्यात आले होते. दुसरीकडे पत्नीने आरोप केला की, हुंड्याच्या लालचीनेच पती असे करत आहे. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावली.

 

लग्नाआधी नाही पाहू शकला चेहरा
सुनावणीदरम्यान पतीने सांगितले की, लग्नाआधी जेव्हा मुलगी पाहायला गेलो होतो, तेव्हा तिने ओढणीने चेहरा झाकलेला होता. सासरच्यांनी सामाजिक परंपरांचा हवाला देत पत्नीचा चेहरा न दाखवण्याचे आणि जवळ न जाण्याची ताकीद दिली होती. यामुळे त्याला होणाऱ्या पत्नीचा चेहरा पाहता आला नव्हता.

 

लग्नानंतर का नाही पाहिला चेहरा?
पतीने यावर स्पष्टीकरण दिले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा पत्नीचा चेहरा पाहिला, तेव्हा ती क्लीन शेव्ह आणि मेकअपमध्ये होती. असेच दोन-तीन दिवस गेले. मग एका दिवशी पत्नीच्या चेहऱ्यावर काही केस दिसल्यावर त्याला सत्य कळले. पत्नीशी जितक्या वेळेस बोलणे झाले, त्यादरम्यान तिने आवाज बदलून संवाद साधला. त्याचा नैसर्गिक आवाज पुरुषांसारखा आहे.

 

पत्नीने फेटाळून लावले आरोप
पत्नीने पतीचे सर्व आरोप फेटाळून लावले. ती म्हणाली की, पतीने हुंड्याची मागणी केली होती. परंतु मागणी जेव्हा पूर्ण झाली नाही, तेव्हा त्याने ही कहाणी रचली.

 

कोर्टाने काय म्हटले?
कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. यानंतर जज म्हणाले की, अशा कारणांमुळे घटस्फोटाला मंजुरी दिली जाऊ शकत नाही. असे सांगत जजनी याचिका फेटाळून लावली.  

बातम्या आणखी आहेत...