आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले, निफ्टी 10400 च्या वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेरिकेच्या बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर शुक्रवारीही पाहायला मिळाला. शुक्रवारी भारतीय शेअर मार्केटची सुरुवात मोठ्या घसरणीसह झालेली पाहायला मिळाले. सेन्सेक्स 410 अंकांनी घसरून 34002 अंकावर उघडला. तर निफ्टी 160 अंकांनी घसरून 10416 वर उघडला. बीएसईच्या बेंचमार्क इंडेक्सच्या सर्व 30 शेअर्समध्ये घसरणीमुळे सेन्सेक्स आणखी 550 अंकांनी घसरला आहे. बाजारातील घसरणीमध्ये वाढ झाल्याने एका मिनिटात व्यावसायिकांचे 2 लाख कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले. 


काही मिनिटांत बुडाले गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी 
सुरुवातीच्या व्यवसायानंतर लार्ज कॅप शेअर्स आणि मिडकॅप तसेच स्मॉसकॅप शेअर्सधील नफेखोरीमुळे गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले. गुरुवारी बीएसईवर लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 1,47,99,096.88 कोटी होते. सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या 550 अंकांच्या घसरणीनुळे गुंतवणूकदारांचे 2,11,229.88 कोटी बुडाले. 


मिडकॅप-स्मॉलकॅप शेअरही घसरले 
सुरुवातीच्या व्यवसायात लार्जकॅप शेअर्सबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळत आहे. बीएसईचे मिडकॅप इंडेक्स 1.10 टक्के घसरले आहे. मिडकॅप शेअर्समध्ये ग्लेनमार्क, एबीसीसी, इंडियन हॉटेल, इमामी लिमिटेड अजंता फार्मा, आयडीबीआय, एमअँडएम, फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स 7.45-1.95 टक्क्यांपर्यंत घसरला. तर बीएसईचा स्मॉलकॅप इंडेक्स 1018 टक्के घसरला.

 

बातम्या आणखी आहेत...