आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12वीच्या विद्यार्थीनीवर कारमध्ये केला गँगरेप, बेशुध्द अवस्थेत केले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चरखी दादरी- येथे मानकवास गावात एका अल्पवयीन तरूणीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. शाळेतून परतनाऱ्या 17 वर्षीय तरूणीला आरोपीने चाकूचा धाक दाखवून अडवले आणि रात्री घराबाहेर भेटायला आली नाही, तर भावाची हत्या करेन अशी धमी दिली. आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित तरूणी मध्यरात्री घरातून बाहेर पडली, आरोपीने तिचे अपहरण केले आणि बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेत तरूणीला सकाळी घराबाहेर फेकून दिले आणि तेथून फरार झाले.


असे आहे संपूर्ण प्रकरण....
पीडिते सांगितल्यानसार गेल्या सोमवारी ती दुपारी शाळेतून परतत होती, तेव्हा गावाजवळ असताना काही तरूणांनी चाकूचा धाक दाखवून तिला अडवले आणि रात्री घराबाहेर भेटायला आली नाहीस, तर तुझ्या भावाला जिवे मारू अशी धमकी दिली. 
- पीडितेने ही बाब घरच्यांना सांगितली नाही. आरोपीच्या धमकीला घाबरलेली तरूणी मध्यरात्री घरातून मध्यरात्री बाहेर आली. तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी तिचे अपहरण केले आणि बाहेर येताच तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक बालात्कार केला.
- यानंतर दुसऱ्या दिवशी साकाळी 4 वाजेच्या सुमाराह बेशुध्द अवस्थेत तरूणीला तिच्या घराबाहेर पेकून दिले आणि सर्व आरोपी फरार झाले. नातेवाईकांनी बदनामीच्या भितीने याची तक्रार केली नाही.


नंतर केली तक्रार....
- पीडितेच्या वडिलांच्या जबाबावरून पोलिसांनी चार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एक विकास नावाचा आरोपी गावातीलच रहिवाशी आहे.


पोलिस करेल कडक कार्यवाही -एसपी
- एसपी हिमांशु गर्ग यांनी सांगितले की, पोलिसांनी केस दाखल केले असून चौकसी सुरू केली आहे. पोलिस या प्रकरणी कठोरातील कठोर कार्यवाही करेल.


सर्व फोटोज- जगदीप सिंह
पुढील स्लाइढवर पाहा, संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...