आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: आईने शाळेत सोडताच या छकुलीचा मृत्यू, मेन गेटमध्ये उतरला होता विद्युत प्रवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्तौडगड - जिल्ह्यातील बोराव परिसरातील एका खासगी शाळेत वीजेच्या तीव्र झटक्याने एका 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या शाळेच्या मेन गेटमध्ये विद्युत प्रवाह आला होता. आईने शाळेत सोडताच मुलीने गेटला हात लावला आणि हा अनर्थ घडला. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जिनेंद्र शिक्षण संस्थेचा संचालक संचालक अरविंद विश्नोईच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर जिल्हाधिकारी कैलाशचंद शर्मा यांच्या आदेशानुसार, शाळा सील करण्यात आली आहे. सोबतच शिक्षण अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून घटनेच्या विरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. 


गतवर्षीही गेटमध्ये आला होता विद्युतप्रवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, नंद किशोर यांची मुलगी अक्षिता सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास आपल्या आईसोबत शाळेत पोहोचली होती. याचवेळी गेटचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला. विद्युत वितरण कंपनीने चौकशी केली. तेव्हा अख्ख्या इमारतीमध्ये विद्युत प्रवाह होत असल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर शाळेच्या बिल्डिंगच्या खराब वायरिंगमुळे यापूर्वीही पावसाळ्यात शॉक लागल्याच्या घटना घडल्या. गेल्या वर्षी सुद्धा या शाळेत करंट लागल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तज्ञांनी वायरिंग आणि उपकरणे बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. परंतु, शाळा प्रशासनाने त्यावर दुर्लक्ष केले. बोराव परिसरात 2 वर्षांपूर्वीच ही शाळा सुरू झाली. त्याचे बांधकाम आणि वायरिंग स्वस्तात, निष्काळजीपणे करण्यात आले होते. सोबतच या शाळेला मान्यता कशी मिळाली याची चौकशी सुद्ध सुरू करण्यात आली आहे. 


हात धरून शाळेत घेऊन गेली होती आई
या घटनेनंतर आईचे रडून हाल झाले आहेत. तिनेच आपल्या छकुलीला सकाळी-सकाळी तयार करून तिच्या हातात आपले बोट देऊन शाळेत नेले होते. आपल्या मुलीला शाळेच्या गेटवर सोडून टाटा-बायबाय केले. आपली मुलगी शाळेत हसतमुखाने गेली आणि हसतमुखाने घरी येईल असे तिला वाटले होते. आई शाळेच्या इमारतीबाहेर पडलीच होती, की अचानक दुखद वार्ता आली. 


संचालक म्हणतो, चूक शाळेची नाहीच!
शाळेचा संचालक अरविंद कुमार विश्नोईने आपल्यावर लावलेले आरोप नकारले आहेत. सोबतच या मुलीच्या मृत्यूमध्ये चूक शाळेची नसून शेजारच्या दुकानदाराची आहे असा दावा त्याने केला. शेजारीच महावीर कुमार जैन याचे दुकान आहे. त्याच्या काही पत्रे आहेत. त्या पत्र्यांतून दुकानात आणि दुकानातून शाळेत गेल्या वर्षी सुद्धा विद्युत प्रवाह आला होता. ती चूक शोधून दुरुस्तही करण्यात आली होती. त्यामुळे, यात शाळेच काहीच दोष नाही असे दावा त्याने केला.

बातम्या आणखी आहेत...