आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान: लग्न सोहळ्यात 3 सिलिंडर स्फोट, 5 जण ठार, 21 जखमी; एक डझन घरांचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या बिल्डिंगमध्ये लग्न सोहळा सुरु होता तिथे गॅस सिलिंडर स्फोटानंतर छत कोसळले. - Divya Marathi
ज्या बिल्डिंगमध्ये लग्न सोहळा सुरु होता तिथे गॅस सिलिंडर स्फोटानंतर छत कोसळले.

ब्यावर (राजस्थान) - येथे शुक्रवारी सायंकाळी एका लग्नसोहळ्यात 3 LPG गॅस सिलिंडर फुटले आहे. या स्फोटात 5 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, 21 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अजमेर येथे हलवण्यात आले आहे. गॅस सिलिंडर स्फोटानंतर 17 जण बेपत्ता झाले आहेत. स्फोट एवढा मोठा होता की इमारतीचे छतही कोसळले. त्यासोबत शेजारच्या एक डझन घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. ढिगारे उपसण्याचे काम वेगाने सुरु आहे. त्याखाली काही लोक दबले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अशी झाली दुर्घटना
- एका सिलिंडरमधून दुसऱ्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना ही दुर्घटना झाली. काही समजायच्या आत एका सिलिंडरने पेट घेतला आणि एकानंतर एक तीन सिलिंडरचा स्फोट झाला. 
- अजमेर जिल्ह्यातील ब्यावर शहरातील नंद नगर येथील कुमावत समाज भवनात लग्न सोहळा सुरु होता. शुक्रवारी सायंकाळी ही सिलिंडरचा स्फोट झाला. 


एका जखमीने ढिगाऱ्याखालून मोबाइल फोनवर लोकशन सांगितले
- तीन सिलिंडरचा स्फोट एवढा मोठा होती की दोन मजली बिल्डिंग कोसळली आणि ढिगाऱ्याखाली काही लोक गाडले गेले. 
- फायरब्रिगेडसोबतच मदतीसाठी शहरातील लोकही घटनास्थळी पोहोचले. एक जण ढिगाऱ्याखाली अडकला होता, त्याने मोबाइल फोनने आपण ढिगाऱ्याखाली असल्याचे सांगितले. त्याला त्वरीत काढण्यात आले. दोन जणांचा ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला. तर दोन जण अजूनही अडकलेले असल्याची माहिती आहे. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 


स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ घटनास्थळी 
- जिल्हाधिकारी शुक्रवारी उशिरा रात्री घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटना कशी घडली आणि जखमींना काढण्याचे काम कसे सुरु आहे याचा आढावा घेतला. 
- ढिगारा उपसण्यासाठी आणि जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स)  पाचारण करण्यात आले. त्यासोबत एनडीआरएस (नॅशनल डिझास्टर रिकव्हर सपोर्ट) ढिगाऱे उपसण्याचे काम करत आहे. 

 

यामुळे वाचला नवरदेव... 
- प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, नवरदेव हेमंत दुर्घटना झाली त्याच बिल्डिंगमध्ये होता. तो त्याचे मित्र आणि परिवारासोबत बसून हातावर मेंदी काढत होता. जेव्हा स्फोट झाला त्याच्या काही क्षण आधी तो पीक थुंकण्यासाठी बिल्डिंगच्या मेन गेटकडे गेला होता. त्याच क्षणी बिल्डिंगमध्ये अचानक स्फोट झाला. यामुळे तो पूर्णपणे घाबरला असून शनिवार सकाळपर्यंत कोणाशी काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता. 


20 फूट फेकला गेला मुलगा
- स्फोटानंतर कुमावत समाज भवानासमोरील एका घराच्या छतावर बसलेला एक मुलगा साधारण 20 फूट फेकला गेला. त्याचे वडील हेमंत कुमावत म्हणाले, आमचे छत मोठे असल्याने मुलगा वाचला. नाही तर खाली पडून तो गंभीर जखमी झाला असता. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा स्फोटानंतर कोसळलेली घरे...

बातम्या आणखी आहेत...