आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • राजस्थानच्या 4 जिल्ह्यांत 100 किमी प्रतितास वेगाने वादळ Several People Died In Rajasthan Due To Heavy Thunderstorm

12 राज्यांत वादळी पाऊस; 130 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक लोक जखमी, पिकांचे प्रचंड नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरूवारी हैदराबादेत पावसानंतरचे चित्र. - Divya Marathi
गुरूवारी हैदराबादेत पावसानंतरचे चित्र.

लखनौ/ जयपूर - बुधवारी रात्री उत्तर भारतात वादळामुळे धुळीचे लोट उठले. या वादळाच्या परिणामी दक्षिणेकडील राज्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. हवामानातील या बदलाचा १२ राज्यांवर परिणाम झाला. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्लीत अक्षरश: धुळीचे वादळ आले, तर तेलंगणा, प. बंगाल आणि आंध्र प्रदेशात वादळी पाऊस झाला. यात १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ३०० हून अधिक जखमी झाले. हजारो घरे, शेकडो वाहने आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले. 


वाऱ्याचा प्रचंड वेग : ताशी १२० किमी वेगाने वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांबही उखडले गेले. रस्त्यांवर तसेच रेल्वे मार्गांवर वृक्ष उन्मळून पडल्याने तसेच खांब पडल्याने वाहतूकही ठप्प झाली.राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादळात झालेल्या मृत्यूंबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.

 

ताशी ४० किमीपेक्षा अधिक वेगात वाऱ्याचे होते वादळात रुपांतर
वाऱ्याचा दाब वाढल्यानंतर वातावरणात उंचीवर असलेली थंड कोरडी हवा जमिनीकडे खेचली जाते. सूर्याच्या थेट किरणांमुळे ही हवा जमिनीपर्यंत येताना प्रचंड गरम होते. या हवेत बाष्प नसल्याने पाऊस पडत नाही. त्यामुळे धुळीचे कण वाऱ्यासोबत वातावरणात पसरतात. या वाऱ्याचा वेग ताशी ४० किमीपेक्षा अधिक असेल तर हे धूलिकण वादळाचे रूप घेतात.

 

उत्तर प्रदेशात वादळ-पावसामुळे ७३ मृत्यू
उत्तर प्रदेशात वादळी वारे, पावसामुळे ७३ लोकांचा मृत्यू झाला. अाग्र्यामध्ये एका भागात सर्वाधिक नुकसान झाले. या भागात ४३ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ४ लाख रुपये मदत जाहीर केली. 

 

राजस्थान : सर्वाधिक मृत्यू भरतपूरमध्ये
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे हेमंत कुमार गेरा यांच्यानुसार, राजस्थानातील भरतपूर, धौलपूर आणि अलवर जिल्ह्यांना या प्रचंड फटका बसला. भरतपूरमध्ये १७, धौलपूरमध्ये ९, अलवरमध्ये ९, तर झुंझुनूमध्ये एकाचा मृत्यू झाला. १०० हून अधिक जखमी झाले.

 

राजस्थानात मृतांच्या नातेवाइकांना मदत
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या वादळात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करून मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत दिली जाईल, असे जाहीर केले. या जीवित हानीबद्दल राजे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

 

दिल्लीत वादळी वारे, दुपारनंतर पारा निम्म्याने घसरला...
दिल्ली परिसरात चक्री वादळासारखे वारे वाहू लागल्याने अचानक वातावरण बदलले. दिवसभर तप्त ऊन होते. मात्र, सायंकाळी पाचनंतर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहू लागले आणि काही वेळातच पाऊसही झाला. यामुळे ३८.३ अंशांवरून पारा एकदम २०.४ अंशावर घसरला.

 

 

 

जिल्हा मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या
आग्रा 43
बिजनौर 3
बरेली 1
सहारनपुर 2

पीलीभीत

1
चित्रकूट 1
रायबरेली 1
उन्नाव 1
मथुरा 1
अमरोहा 1
कन्नौज 1
बांदा 1
कानपुर नगर 1
कानपुर ग्रामीण 3
सीतापुर 1
संभल 1
मिर्जापूर 1

 

आणखी दोन दिवस वादळी वारे राहणार 
हवामान खात्यानुसार आणखी दोन दिवस राजस्थान, उत्तर प्रदेशात हे वादळी वारे वाहतील.  या भागात चक्रीवादळासारखी स्थिती आहे. याचा परिणाम राजस्थानच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांवर पडू शकतो. 

 

हवामान अचानक का बदलले  
तीन दुर्मिळ हवामान प्रणाली एकत्र आल्याने वातावरण एकदम बदलले. वेस्टर्न डिस्टर्बन्सने राजस्थान, पंजाब व हरियाणावर चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण केली. यामुळे गरजणाऱ्या ढगांची निर्मिती झाली. हा पॅटर्न उत्तर प्रदेशाकडे सरकला. या भागात बंगालच्या खाडीकडून आलेले बाष्पयुक्त वारे यात मिसळल्याने वादळाची निर्मिती झाली. 

 

पूर्वसूचना मिळू शकत नाही का?  
सुमारे १५०० मीटर उंचीवर ही प्रणाली तयार होते. एखाद्या काेरड्या भागात ९०% आर्द्रता असलेले वारे अचानक येतात तेव्हा दोन तासांत गरजणारे ढग तयार होऊ लागतात आणि वादळासारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळे पूर्वसूचना किंवा बचावासाठी वेळ मिळत नाही. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, वादळाच्या निर्मितीमागे तीन कारणे...  

 

बातम्या आणखी आहेत...