आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर शमीचे अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध, पत्नी हसीन जहाँने केले हे खळबळजनक आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीसोबतच्या याच फोटोवरुन सोशल मीडियावरुन शमीवर टीका झाली होती (फाइल) - Divya Marathi
पत्नीसोबतच्या याच फोटोवरुन सोशल मीडियावरुन शमीवर टीका झाली होती (फाइल)

कोलकाता - भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी विरोधात पत्नी हसीन जहाँने विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. शमीचे एक नाही तर अनेक महिलांसोबत एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर असल्याचा खळबळजनक आरोप हसीन जहाँने केला आहे. यामध्ये काही विदेशी महिला देखील आहेत. हसीन जहाँने तिचे फेसबुक मॅसेंजर आणि व्हॉट्सअॅपचे काही स्क्रिन शॉट्स शेअर केले आहेत. त्या आधारावर तिने शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. 

 

शमीवर मारहाणीचाही आरोप 
- धर्मशाळा येथे देवधर ट्रॉफीमध्ये व्यस्त असलेल्या शमीच्या पत्नीचे म्हणणे आहे की पतीविरोधात तिच्याकडे अनेक पुरावे आहेत. त्याचे अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध असून साऊथ अफ्रिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्याने  मारहाण केली होती, असे हसीन जहाँने म्हटले आहे. 

 

हसीन जहाँने शेअर केले हे पुरावे... 
- हसीन जहाँच्या कथित फेसबुक अकाऊंटवरुन शमीचे इतर महिलांसोबत संबंध असल्याचा आरोप झाला आहे. त्यासाठी तिने शमीने इतर महिलांसोबत केलेल्या चॅटिंगचे स्क्रिन शॉट्स शेअर केले आहे. त्यात अनेक अश्लिल शब्दांचा वापर झालेला आहे. 
- शमीच्या पत्नीने काही विदेशी महिलांचे फोटो शेअर करुन त्या शमीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला आहे. या सर्व पोस्ट गेल्या दोन दिवसांतील आहेत. 

 

शमीची प्रतिक्रिया आली...
मोहम्मद शमीवर पत्नीने आरोप केल्यानंत आता त्याची प्रतिक्रिया आली आहे. शमीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे की हे माझ्याविरोधातील मोठे षडयंत्र आहे. तो म्हणाला, 'हाय, मी मोहम्मद शमी. सध्या माझ्या पर्सनल लाइफबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्या सपशेल खोट्या आहे. हे माझा खेळ खराब करण्यासाठीचे मोठे षडयंत्र सुरु आहे.'

 

 

पत्नीच्या फोटोवरुन कट्टरपंथींनी केले होतो टार्गेट 
- मोहम्मद शमीचे जून 2014 मध्ये कोलकाताच्या हसीन जहाँसोबत लग्न झाले होते. या कपलला आयरा नावाची एक मुलगी आहे. 
- शमीची पत्नी हसीन जहाँ ही पूर्वी मॉडलिंग करत होती. 
- लग्नानंतर शमीने पत्नीसोबत काही फोटो सोशलम मीडियावर शेअर केले होते, तेव्हा कट्टरपंथींनी त्याला लक्ष्य केले होते. 

 

कोण आहे मोहम्मद शमी 
- उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी फास्ट बॉलर आहे. 2005 मध्ये क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी तो कोलकात्याला पोहोचला होता. येथे त्याने डलहौजी अॅथिलेटिक्स क्लबमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. 
- शमीला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्याचे दोन्ही भाऊ देखील क्रिकेटर आहेत. मोठ्या भावाने आजारपणामुळे क्रिकेट सोडले आणि वडीलांच्या व्यवसायात मदत करु लागला. 
- शमीचे वडील तौसिफ अली देखील क्रिकेटर होते. ते त्यांच्या काळातील वेगवाग गोलंदाज म्हणून परिचीत होते. मात्र पुरेशा सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही. आता त्यांचे ट्रॅक्टर स्पेअर पार्ट्सचे दुकान आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शमीचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...