आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद यादवांनी तुरुंगात घेतली लालुंची भेट, विरोधकांच्या एकतेसाठी झारखंडच्या नेत्यांशीही चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद यादव भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांना एकवटवण्यासाठी यात्रा काढत आहेत. - फाइल - Divya Marathi
शरद यादव भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांना एकवटवण्यासाठी यात्रा काढत आहेत. - फाइल

रांची - जनता दल युनायटेड (जेडीयू) मधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी सोमवारी बिरसा मुंडा जेलमध्ये लालू यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम) चे प्रमुख बाबुलाल मरांडीही होते. दोघांनी तुरुंगात अशलेल्या लालुंची विचारपूस केली.

 

शरद यादव म्हणाले, भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांना एकवटवण्यासाठी ते देशभरात यात्रा काढत आहेत. लालू यादव यांच्याशी चर्चेशिवाय त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) नेते हेमंत सोरेन यांच्याशीही पोनवर चर्चा केली. असे समजले जात आहे की, लालू तुरुंगात गेल्यानंतर आता बिहार-झारखंडमध्ये एखादे नवे सत्तासमीकरण समोर येऊ शकते. 


केंद्र सरकार घटनाबाह्य काम करत आहे 
- विरोधकांना एकवटवण्यासाठी झारखंड दौऱ्यावर आलेले शरद यादव म्हणाले, मोदी सरकार घटनाबाह्य कामे करत आहे. संविधान धोक्यात आले आहे. 
- डॉ. आंबेडकरांचे अनुयायी मात्र कोणत्याही परिस्थितीत त्याचे संरक्षण करतील. आमचे संविधान समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आहे. पण सरकारच्या बहुतांश निर्णयात याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...