आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजनांदगाव (छत्तीसगड) - जिल्ह्यातील डोंगरगांव ब्लॉकचे रहिवासी 60 वर्षीय शत्रुहन सोनकर यांचे अर्धे आयुष्य समाजाने आपल्यावरील बहिष्कार काढावा यासाठी आर्जवं करण्यात गेले. 26 वर्षांपूर्वी समाजातून बहिष्कृत करण्यात आलेल्या शत्रुहन यांनी पोलिसांपासून ते सरकार दरबारी खेटे घातले. परंतु समाजाच्या या दंशापासून त्यांची सुटका झाली नाही.
अंत्यसंस्काराला कोणीच आले नाही...
- शत्रुहन सोनकर यांना त्यांच्या समाजाने 26 वर्षांपूर्वी एका गोष्टी बहिष्कृत केले होते.
- समाजाच्या सदस्यांनी शत्रुहनच्या कुटुंबाशी कोणतेही संबंध न ठेवणे, सुख- दु:खात सामील न होणे आणि कोणत्याही प्रकारचे या कुटुंबाशी न ठेवण्याचे फरमान जारी केले.
- यादरम्यान, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, परंतु समाजातील कोणताही सदस्य त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी गेला नाही.
- काही वर्षांनंतर मुलांचे लग्न झाले, अथक विनंत्या करूनही समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा समाजात घेण्यासाठी नकार दिला.
- यामुळे शत्रुहन यांना आपल्या मुलांच्या लग्नामध्ये एकटेच वऱ्हाडी होऊन जावे लागले.
- आज शत्रुहन यांचा 5 मुलांसह 24 सदस्यांचा कुटुंबकबिला आहे. परंतु बहिष्कारामुळे या सदस्यांना सामाजिक जीवन जगण्याचा अधिकार मिळत नाहीये.
- शत्रुहन वृद्धापकाळातही याच अपेक्षेने न्यायासाठी दारोदार भटकत आहेत की, त्यांचे आयुष्य तर गेले, पण त्यांच्या नातू-पणतूंना असे दिवस बघायला मिळू नयेत.
अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी मागितले पैसे
- शत्रुहन म्हणाले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी समाजातील सदस्यांना खूप विनंत्या केल्या, तर समाजातील लोकांनी याबदल्यात त्यांना 6 हजार रुपये मागितले.
- शत्रुहन म्हणाले की, मी रक्कम देण्यासाठी तयारही झालो होतो, परंतु तरीही समाजातील कोणताही सदस्य अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी आला नाही.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटो
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.