आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे निधन, शशिकलांना 15 दिवसांचा पॅरोल मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई / बंगळुरू - अण्णाद्रमुकच्या बडतर्फ नेत्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. शनिवारी त्यांना छातीत संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाच्या त्रासाची तक्रार असल्याने आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आले.

 

मंगळवारी पहाटे १.३५ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. ग्लेनियगल्स ग्लोबल हेल्थ सिटी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. षण्मुगा प्रियान यांनी ही माहिती दिली. त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न केल्याचे प्रियान यांनी सांगितले. मात्र, त्यांची प्रकृती ढासळली होती.  
नटराजन यांचा मृतदेह त्यांच्या तंजावर जिल्ह्याजवळील मूळ गावी नेण्यात येणार आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. पत्नी शशिकला यांच्या पॅरोल प्रक्रियेनंतर अंत्यसंस्काराची वेळ निश्चित केली जाईल. नटराजन यांचा मृतदेह चेन्नईतील बसंत नगर निवासस्थानी ठेवण्यात आला आहे. येथे राजकीय नेत्यांची व समर्थकांची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली आहे.


तामिळ भाषा व संस्कृती जतनात योगदान : नटराजन यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसल्याचे द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन म्हणाले. द्रमुकच्या विद्यार्थी चळवळीपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. १९६५ मध्ये द्रमुकने हिंदी भाषाविरोधी अभियान सुरू केले होते.  श्रीलंकेतील अल्पसंख्याक तामिळ बांधवांच्या कल्याणासाठी पक्षभेद विसरून नटराजन यांनी योगदान दिले होते.

 

१५ दिवसांचा सशर्त पॅरोल मंजूर, चेन्नईत प्रवेश नाही  
सोमवारीच शशिकला यांनी पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्यांना सशर्त पॅरोल मंजूर झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यादरम्यान त्यांनी तंजावरमध्येच राहावे. चेन्नईत प्रवेशाची त्यांना मनाई करण्यात आली आहे. तामिळनाडू पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर पॅरोल मंजूर झाला आहे.   गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पतीच्या मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शशिकलांना पॅरोल मंजूर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...