आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड-राजकारणात एकमेकांना खूश करणे चालत आले आहे! 'शॉटगन' सिन्हांचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोरियोग्राफर सरोज खान आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांच्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांनीही लैंगिक अत्याचाराबाबत वक्तव्य केले आहे. शत्रुघ्न म्हणाले की, बॉलीवूड आणि राजकारण दोन्ही क्षेत्रात हे सुरुच असते. सरोज खान आणि  रेणुका चौधरी दोघींचेही म्हणणे चुकीचे नाही. सिन्हा म्हणाले की, तुम्ही मला खूश करा मी तुम्हाला खूश करतो हा दोन्ही क्षेत्रात पुढे जाण्याचा हा एक मार्ग आहे आणि तो अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. 


त्यांना काहीतरी माहिती असेल 
शत्रुघ्न सिन्हा यांनी सरोज खान यांचा बचाव करताना म्हटले की, सरोज खान यांनी अनेक अॅक्ट्रेसेसना करिअर करण्यात मदत केली आहे. फिल्म इंडस्ट्रीसाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी जर असे म्हटले असेल, तर त्यांना काहीतरी माहिती असेल. सरोजजी आणि रेणुका यांच्या मताशी मी सहमत आहे. खरे बोलणाऱ्याचा विरोध होता कामा नये. 


हा प्रत्येकाचा स्वतंत्र  निर्णय
कास्टिंग काऊचबाबत सिन्हा म्हणाले की, जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा ती त्यांच्यातील खासगी बाब असते. कोणीही कोणावर बळजबरी करत नाही. प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय असतो. 


काय होता वाद..
कोरिओग्राफर सरोज खान यांनी कास्टींग काऊच बाबल बोलताना म्हटले होते की, कास्टींग काऊच असले तरी येथे मुलींना रोजी रोजी मिळते. बलात्कार करून सोडून दिले जात नाही. तर रेणुका चौधरींनी याविषयी बोलताना म्हटले होते की, प्रत्येक क्षेत्रात कास्टींग काऊच आहे अगदी संसदही त्यापासून सुटू शकलेली नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...