आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ही आहे आसारामची खास शिष्या शिल्पी, गुरुकुलात करायची हे काम Shilpi Gupta Verdict In Special Court At Jodhpur Jail

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे आसारामची खास शिष्या शिल्पी, गुरुकुलात करायची हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसारामसोबतच शिल्पीलाही शिक्षा झाली. - Divya Marathi
आसारामसोबतच शिल्पीलाही शिक्षा झाली.

रायपूर - अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसोबत ज्या शिल्पी ऊर्फ संचिता गुप्ताला साथीदाराच्या रूपात 20 वर्षांची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली, ती रायपूरची आहे. तिचे पूर्ण आसारामचे भक्त होते, यामुळे त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी शिल्पीला आसारामच्या छिंदवाडा गुरुकुलात पाठवले होते.

- शिल्पीचे वडील एम. के. गुप्ता राजधानीत नगर निवेश अधिकारी या मोठ्या हुद्द्यावर काम केल्यानंतर निवृत्त झाले. शहरात त्यांना चांगली प्रतिष्ठा आहे.
- शिल्पीच्या शिक्षेबाबत ते एवढेच म्हणाले की, गुरुकुल आश्रमात मुलीने राहणे सुरू केले होते आणि हळूहळू तिचा कुटुंबीयांशी संपर्क कमी झाला.
- अनेक वर्षांपासून ती ना कुटुंबीयांना भेटली, ना कधी बोलली.
- आसारामला ज्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात शिक्षा झाली आहे, ती छिंदवाड़ामध्ये आसारामच्या गुरुकुल होस्टेलमध्ये होती आणि शिल्पी तेथील वॉर्डन होती.
- केस डायरीमध्ये पोलिसांनी याचे पुरावे सादर केले आहेत की, शिल्पीनेच विद्यार्थिनीला विशेष अनुष्ठानासाठी जोधपूरला जाण्यासाठी प्रवृत्त केले.
- एवढेच नाही, विद्यार्थिनीला तिच्या कुटुंबीयांसोबत तिनेच जोधपूरला नेले, जेथे आसारामने दुष्कृत्य केले.
- शिल्पीचे खरे नाव संचिता गुप्ता आहे. तिने रायपुरच्याच शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले होते.
- तिचे कुटुंब व्हीआयपी रोडला लागून असलेल्या एका कॉलनीत राहायचे. तिचे वडील बुधवारी भास्करला एवढेच सांगून शकले की, 9वीनंतर शिल्पीचा कुटुंबाशी संपर्क तुटला.
- गुरुकुलात ती काय करायची, तिला कोणती जबाबदारी देण्यात आली होती, याबाबत तिने ना कधी सांगितले, ना आम्हाला काही माहिती आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज..

बातम्या आणखी आहेत...