आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशांमधील शिक्षण दहशतवादी तयार करणारे, शिया सेंट्रल वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदरशात अभ्यास करताना मुलं. (फाइल फोटो) - Divya Marathi
मदरशात अभ्यास करताना मुलं. (फाइल फोटो)

लखनऊ - उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या ताज्या वक्तव्याने वादाला तोंड फोडले आहे. रिझवींनी मदरशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, मदरशातील शिक्षणामुळे मुलं दहशतवादी बनत आहेत. मदरशातील शिक्षण इंजिनिअर, डॉक्टर किंवा आयएएस बनण्यासाठी उपयुक्त नाही. हे मात्र खरे की काही मदरशात शिकून मुलं दहशतवादी नक्की बनत आहेत. त्यांना बॉम्ब बनवण्याचे शिक्षण मिळत आहे. रिझवींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मदरशांना सीबीएसई, ईसीसीई आणि राज्य शिक्षण मंडळासोबत जोडण्याची मागणी केली आहे. 

रिझवी म्हणाले, की धार्मिक शिक्षण ऐच्छिक असले पाहिजे, मदरशे आधुनिक शिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे. जेणे करून येथे फक्त मुस्लिम विद्यार्थीच नाही तर इतर धर्मांची मुलंही शिक्षण घेऊ शकतील. 
- रिझवी म्हणाले, सरकारने जर या गोष्टींकडे लक्ष दिले तर आपला देश अधिक मजबूत बनेल.

सेंट्रल वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी केलेल्या या वक्तव्याने वादाला तोंड फोडले आहे. ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लमिन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रिझवींना सर्वात मोठा जोकर म्हटले आहे. ते म्हणाले, रिझवी हे संधीसाधू आहेत त्यांनी त्यांचा आत्मा आरएसएसला विकला आहे.

बातम्या आणखी आहेत...