आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-बहिणीचा खून करण्याच्या 3 तास आधी असा खुश होता मुलगा, पाहा CCTV फुटेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - येथे 4 डिसेंबर रोजी झालेल्या आई-बहिणीच्या खुनाच्या आरोपी मुलाला 8 डिसेंबर रोजी वाराणसीतून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. घटनेच्या दिवशीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपीला जुवेनाइल कोर्टात सादर केले जाईल.

 

खून करण्याच्या 3 तास आधी खुश होता मुलगा...
- ही घटना ग्रेटर नोएडाच्या वेस्ट गौर सिटी 2च्या 11 अव्हेन्यूमधील आहे. येथे फ्लॅट नंबर 1446च्या बेडरूममध्ये आई अंजली (35) आणि मुलगी मणिकर्णिका (12) यांचे मृतदेह आढळले होते.
- 4 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर दोघीही आई अन् मुलीला कुणीही पाहिले नव्हते. नातेवाईक सातत्याने फोन करत होते. फोन उचलला नाही तेव्हा शेजारी राहणाऱ्या नातेवाइकाला फोन केला, मग पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा घरातील बेडरूममध्ये आई-मुलीचा मृतदेह आढळले. मृतदेहांजवळ एक बॅट आणि धारदार शस्त्र आढळले. ते दोन्ही रक्ताने माखलेले होते. घटनेनंतर अंजलीचा 15 वर्षांचा मुलगा रोहन (बदललेले नाव) गायब होता. त्याला 8 डिसेंबरच्या संध्याकाळी वाराणसीतून अटक करण्यात आली.

> घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात रात्री 8 वाजता रोहन आपली आई आणि बहिणीसोबत लिफ्टमध्ये दिसत आहे. लिफ्टमध्ये सर्वजण आनंदात, हसताना दिसत आहेत. रोहनही दोघींसह खुश दिसत आहे.
> या फुटेजनंतर एक व्हिज्युअल रात्री साडे 11चे आहे. यात रोहन पाठीवर बॅग टाकून अपार्टमेंटच्या बाहेर निघताना दिसतो आणि कॅबमध्ये बसून निघून जातो.
> पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, आई-मुलीला आधी गुंगीचे औषध खाऊ घालून बेशुद्ध करण्यात आले, यानंतर कैचीने अनेक वार करण्यात आले. मग बॅटने दोघींच्या डोक्यावर अनेक वार करण्यात आले. दोघींचा मृत्यू 4 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता झाला.


पोलिसांच्या मते, मुलानेच आई-बहिणीची हत्या केली..
> एसएसपी लव कुमार म्हणाले- खुनामागे मोबाइल गेम खेळू न देणे हे कारण नव्हते. अभ्यासात कमजोर असल्याने त्याला नेहमी बोलणे खावे लागायचे. नेहमीच्या रागावण्याने मुलाच्या मनात एक चीड निर्माण झाली होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...