आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking लिंगबदल केलेल्या महिलेला शिक्षिकेच्या नोकरीसाठी मुलाखतीत विचारले असे प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुपारची वेळ. तिशीतील सुचित्रा प्रिंसिपलच्या केबिनमध्ये गेल्या. इंग्रजी आणि भुगोल विषयात एम.ए., बीडएड्ची पदवी आणि जोडीला १० वर्षांचा शिकवण्याचा अनुभव असल्याने नोकरी आपणालाच मिळेल हा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. फाइल चाळल्यानंतर प्रिंसिपलने जे काही विचारले ते ऐकून सुचित्रांच्या पायाखालची वाळूच सरकली. शैक्षणिक योग्यतेवर प्रश्न विचारले जातील हा त्यांचा समज पूर्णपणे फोल ठरला. प्रश्न विचारले गेले ते त्यांच्या लैंगिकतेवर. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर तुमची गर्भधारणा शक्य आहे का?, स्तन कृत्रिम आहेत की नैसर्गिक? यात दूध निर्माण करण्याची क्षमता आहे की नाही? या प्रश्नांचा त्यात समावेश होता. 


एक ना अनेक घाणेरड्या प्रश्नांची सरबती पुढील काही दिवस पाच, सहा शाळांमध्ये सुरूच होती. हा अनपेक्षित आघात केवळ सुचित्रांनी केलेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेमुळेच होत होता. वयाच्या २७ ते २८ वर्षांपर्यंत पुरूष म्हणून जगताना प्रचंड घुसमट झाली. सर्व असह्य झाल्यानंतर लिंगबदल शस्त्रक्रिया करून त्यांनी स्वत:मधील घुसमट तर थांबवली. पण समाजातील विचित्र मानसिकता त्यांना मुक्तपणे जगू देत नाही. सुचित्रा काल काय होत्या आणि आज त्यांचे रूप काय? यापेक्षा प्रचंड संघर्षातून मिळवलेल्या ज्ञानाचा समाजाला आणि पुढच्या पिढीला याचा फायदा होऊ शकतो हा विचार इथं होत नव्हता. सूचित्रांनी पुरूष असताना उच्चशिक्षण घेतले. पण स्वत:मधील शारीरिक आणि मानसिक बदल ओळखून शस्त्रक्रिया करून त्या महिला झाल्या. या बदलामुळे इतके वर्षे घेतलेलं शिक्षण आणि १० वर्षांचा अनुभव शून्य तर होत नाही. 

 

…अन्यथा पुरूषांचे कपडे घाला
मुलाखतीदरम्यान खूप वाईट अनुभव आले. कागदपत्रांवर पूर्वीचे हिरण्यमय डे असे पुरूषाचे नाव आहे. त्यामुळे पुरूषांच्या ड्रेसमध्ये कामावर यावे लागेल, अशी अट घालण्यात आली. एका प्रिंसिपलने तर चक्क आम्ही तृतीयपंथीयांना नोकरी देत नाही, असे म्हटले. तृतीयपंथीय आणि लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्यांमधील फरक समजून सांगितले तरी त्याने नोकरी दिली नाही.


भावनांशी खेळ करून फसवले
आध्यात्मिक गुरुच्या एका शिष्याने त्यांना सहानुभूती दाखवून फसवले. लुधियानातील विवाहित पुरूषाने घनिष्ठ संबंध निर्माण केले आणि नंतर सोडून निघून गेला. भविष्यात समजून घेणारा जीवनसाथी मिळाल्यास संसार थाटण्याची इच्छा सुचित्रा यांनी व्यक्त केली.


पुढे वाचा.. सुचित्रा यांच्या जीवनाविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...