आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Incident 6 Year Old Son Killed Brutally By His Mother In Punjab Bathinda

Shocking: 6 वर्षांच्या मुलाने अंघोळीला दिला नकार, आईने चिडून धारदार हत्याराने केले 24 वार, आतडेही आले बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भटिंडा (पंजाब) - भाई मतिदासनगरात रविवारी सकाळी एका महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. मुलाने अंघोळीला नकार दिल्याने आईला एवढा राग आला की, तिने बाथरूममध्ये आधी मुलाला बेदम मारहाण केली. मुलगा ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडात टॉवेल कोंबला आणि मग एका धारदार शस्त्राने त्याच्यावर 24 वार करून त्याची हत्या केली. या घटनेत चिमुरड्याचे आतडेही बाहेर आले होते. यानंतर तिने स्वत:हूनच कुटुंबीयांना हत्येची माहिती दिली. आरोपी आईला अटक करण्यात आली आहे. 

 

स्वत:च म्हणाली- मी मुलाला मारून टाकले...
- चिमुरडा हरकिरत सिंग ऊर्फ हेवी शहरातील लॉर्ड रामा पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत होता.
- पंजाब अॅग्रो इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमधून मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले बालकाचे आजोबा गुरचरण सिंग म्हणाले, ही घटना रविवारी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली. ते आणि त्यांचा मुलगा परमिंदर कार वॉश करत होते. त्यांना हेवीला सोबत फिरायला न्यायचे होते. सून राजवीर कौर त्याला अंघोळीसाठी बाथरूममध्ये घेऊन गेली, परंतु तो अंघोळीला नकार देत होता. काही वेळाने अचानक त्याच्या रडण्याचा आवाज बंद झाला. यादरम्यान राजीवरने स्वत: बाहेर येऊन सांगितले की, तिने हेवीचा खून केला आहे.

 

मला माझ्या बाळाला भेटू द्या, मी नाही मारलं...
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हत्येची आरोपी आई राजवीर कौर हिला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा ती जोरजोरात ओरडून म्हणू लागली की, मला माझ्या बाळाला भेटू द्या, तो ठीक आहे. मी त्याला नाही मारलं.

- तथापि, प्रत्यक्षदर्शी सांगतात की, राजवीरच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. हत्येची माहिती मिळाल्यानंतर तेथे आलेली मृत चिमुरड्याची आजी बलवीर कौर यांनी पोलिसांसमोर हात जोडून विनवणी केली की, माझ्या मुलीला सोडून द्या, तिने काहीही केलेले नाही. त्या पोलिसांच्या पायावर पदर पसरून मुलीच्या सुटकेची याचना करत होत्या.
- एसपी सिटी गुरमित सिंग म्हणाले, आता महिला असे म्हणतेय की, ती तणावात होती आणि तिला स्वत:वरच वार करायचे होते, पण तिचा स्वत:वरील ताबा सुटला अन् तिने बाळावरच सपासप वार केले.

 

हत्येच्या एका तासापूर्वी झोपाळ्यावर बसवून खाऊ घातले होते...
- आरोपी राजवीर कौरने एका दिवसापूर्वीच मुलाकडून शाळेचा होमवर्क करून घेतला होता आणि 2 जुलैला शाळेत पाठवण्याची तयारी करत होती.
- हत्येच्या एका तपासापूर्वी हरकिरत गल्लीत खेळत होता. त्याची आईच त्याला जेवू घालण्यासाठी घरी घेऊन आली. मुलाला झोपाळ्यावर बसवून जेवू घातले.
- कुटुंबीयांच्या मते, घरातल्या सगळ्यांनी मिळून नाष्टा केला होता. नंतर अंघोळीसाठी त्याची आई मुलाला तिच्या रूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये घेऊन गेली होती. 

 

डिप्रेशन वा हाय- ब्लड प्रेशरमुळे कुणीही मर्डर करू शकत नाही...
ज्या निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे, ती ना डिप्रेशनमुळे, ना हाय ब्लड प्रेशरची केस आहे. कारण कोणतीही व्यक्ती डिप्रेशन वा बीपी हाय झाल्यावर असे कृत्य करू शकत नाही. जर त्याने अशा प्रकारची हत्या केलीच, तरीही तो एकापेक्षा जास्त वार करू शकत नाही.
- डॉ. अरुण बन्सल, मनोचिकित्सक, सिव्हिल हॉस्पिटल.

 

घराचा एकुलता कुलदीपक होता चिमुरडा
शेजारी म्हणाले- राजवीर एक क्षणही तिच्या मुलाला दूर होऊ देत नव्हती. लग्नानंतर 6 वर्षे परमिंदर आणि राजवीर कौरने अनेक मंदिरे-गुरुद्वाऱ्यांमध्ये नवससायास केले, तेव्हा कुठे हेवीचा जन्म झाला होता. हरकिरतचे वडील परमिंदर सिंग पाली प्रॉपर्टी डीलर आहेत. घटनेनंतर तेथे आलेल्या त्यांच्या मित्रांनी सांगितले की, हेवी फिरायला जाण्याचा हट्ट करत होता. यामुळेच परमिंदरने त्यांना शहरात फिरवून आणण्याचा बेत आखला होता. त्यामुळेच त्यांनी हेवीला अंघोळ घालायला सांगून स्वत: कार धूत बसले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भयंकर घटनेचे आणखी photos..   

 

बातम्या आणखी आहेत...