आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: सुटीवर आला जवान, नुकत्याच लग्न होऊन आलेल्या भावजयीवर केला बलात्कार, असा झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिवानी (हरियाणा) - येथे दीर-भावजयीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. लष्करातून सुटी घेऊन दीर घरी आल्यावर आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवू लागला. एका दिवशी कुटुंबातील सदस्य कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते, तेव्हा दिराने नवविवाहित भावजयीला गुंगीचे औषध खाऊ घातले. यानंतर त्याने भावजयीवर बलात्कार केला आणि कुणाला काही सांगशील तर जिवे मारून टाकीन अशी धमकीही दिली. पोलिसांनी जवानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  

 

असे आहे प्रकरण...

भिवानीतील रहिवासी 22 वर्षीय तरुणीचे लग्न काही महिन्यांपूर्वीच सोनिपतमधील एका गावात झाले होते. नवविवाहितेने पोलिसांत तक्रार दिली की, तिचा दीर आर्मीमध्ये आहे. तो 27 मार्च 2018 रोजी लष्करातून काही दिवसांची सुटी घेऊन आला होता.

 

घरातले बाहेर गेल्यावर दिले गुंगीचे औषध

27 मार्च रोजी तिचा पती आणि सासरचे काही इतर सदस्य आपापल्या कामानिमित्त बाहेर गेलेले होते. यादरम्यान तिच्या दिराने तिला गुंगीचे औषध खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा हा प्रकार कळून धक्काच बसला. ती अर्धनग्नावस्थेत होती. तिने दिराला याचा जाब विचारला, तेव्हा त्याने बेदम मारहाण केली आणि कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

 

नांदायला का जात नाही विचारल्यावर झाला खुलासा..

यानंतर नवविवाहिता तेथून माहेरी आली. अनेक दिवस तिने दिराच्या भीतीपोटी ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. तिने सासरी परत जायला नकार दिल्यावर घरच्यांनी याचे कारण विचारले. तेव्हा तिने रडत-रडत सर्व हकिगत आपल्या आईवडिलांना सांगितली.

 

काय म्हणतात पोलिस?

या प्रकरणाच्या तपास अधिकारी सुशीला देवी म्हणाल्या की, महिला पोलिस स्टेशनमध्ये नवविवाहितेच्या तक्रारीवरून तिच्या दिराविरुद्ध झीरोने एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही केस आता तपासासाठी सोनीपत पोलिसांना ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. तपासानंतर आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी माहिती व photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...