आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: प्रेमीयुगुलाने घेतला गळफास, दोघेही होते विवाहित Shocking News Married Love Commit Suicide With Hang In Gujrat

प्रेमीयुगुलाने घेतला गळफास, दोघेही होते विवाहित, कुटुंबीयांच्या विरोधामुळे उचलले पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> 5 वर्षांपासून सुरू होते दोघांचे प्रेमसंबंध.
> कुटुंबीयांच्या विरोधामुळे उचलले हे पाऊल.

 

व्यारा (गुजरात) - व्यारा तालुक्यातील खोडतलाव गावातील रहिवासी 42 वर्षीय विवाहित पुरुषाचे सोनगड तालुक्यातील अमालगुडीच्या 42 वर्षीय विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. गत 5 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते. कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोघींनीही घरातून पळून जाऊन विषप्राशन केले, त्यानंतर ओढणीने एकत्र गळफास लावला.

 

रात्रीच घरातून पळून गेले होते...

तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यातील खोडतलाव गावात बाजार फलियामध्ये रसिकभाई मंछीभाई चौधरी आपल्या कुटुंबीयांसोबत मजुरी करत होते. 5 वर्षांपूर्वी दोघांत प्रेमसंबंध जुळले. मागच्या 5 वर्षांपासून त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. दरम्यान, कुटुंबीयांनी विरोध केल्याने दोघांनी एकत्र आत्महत्येचा निर्णय घेतला. यासाठी दोघांनीही आपापले घर सोडले.

 

आधी केले विषप्राशन, मग लावला गळफास
बुधवारी सकाळी रसिकभाई आणि शीलाबेन गामित यांनी व्यारामधील डुंगरीफलिया हे ठिकाण गाठले. येथे जाऊन दोघांनी आधी विष प्राशन केले, त्यानंतर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा त्यांचा मृतदेह फासावरून उतरवण्यात आला, तेव्हा दोघांच्याही तोंडातून फेस बाहेर येत होता. यावरून कळते की, मृत्यूआधी दोघांनीही विष प्राशन केले होते. रसिकभाईंच्या मुलाने याची माहिती काकरापार पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले आहेत, पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...