आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accident: भरधाव बसची ऑटोला धडक, ड्रायव्हरचे शिर धडावेगळे, तर एकाचा ऑटोमध्येच अडकला मृतदेह Shocking Photo Of Road Accident

Accident: भरधाव बसची ऑटोला धडक, ड्रायव्हरचे शिर धडावेगळे, तर एकाचा ऑटोतच अडकला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलाई (छत्तीसगड) - सुसाट असलेल्या बसने राँग साइड जाऊन एका रिक्षाला जोरदार धडक दिली. बसचा वेग एवढा प्रचंड होता की, ऑटोरिक्षाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. ऑटोमध्ये स्वार लोक उसळून रस्त्यावर आदळले. आसपासच्या लोकांनी जेव्हा हा अपघात पाहिला तेव्हा पाहणारेच हादरून गेले. रिक्षात बसलेल्या 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 

- बस-ऑटोची धडक एवढी भीषण होती की, ऑटो चालकाचे शिर तुटून धडाला लटकत होते.
- दुसरीकडे, एक तरुण ऑटोमध्येच चिरडून दबून गेला, कटरच्या साहाय्याने कापून त्याला बाहेर काढावे लागले.
- मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ होते. मोठ्या भावाचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.
- मृतांची शिवकुमार साहू, दुर्गेश आणि दादू अशी नावे असल्याचे कळते. शिवकुमार आणि दुर्गेश दोघेही भाऊ होते. ऑटोही त्यांचाच होता.

- अपघाताची माहिती मिळताच पूर्ण घरासह गल्लीत शोककळा पसरली. प्रत्यक्षदर्शी उमाशंकर म्हणाले की, या बसमध्ये तब्बल 40 जण स्वार होते.
- बस उलटल्यामुळे बसमधून निघणे कठीण होऊन बसले होते. यामुळे काचा फोडून लोक बसबाहेर आले.
- बसमधील प्रवाशांपैकी 12 जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


गॅस कटरने कापून काढले बाहेर
- संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णालयात फक्त 2 मृतांचेच मृतदेह आणण्यात आले होते. तर एक मृतदेह ऑटोमध्येच फसला होता.
- घटनास्थळी तहसीलदार आणि पोलिसांनी धाव घेऊन गॅस कटरच्या साहाय्याने मृतदेह काढले.
- मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी मोर्चरीमध्ये ठेवण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...