आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • यामुळे भक्तांना नपुंसक बनवायचा आसाराम, अन् स्वत: घ्यायाचा लैंगिक शक्तिवर्धक औषधे Asaram Sentenced For Life Time Imprisonment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यामुळे भक्तांना नपुंसक बनवायचा आसाराम, अन् स्वत: घ्यायचा लैंगिक शक्तिवर्धक औषधे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अल्पवयीन शिष्येवर बलात्कार प्रकरणात आसारामला बुधवारी जन्मठेप झाली. तथापि, एका सेवेकऱ्याने आसारामबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. सेवेकरी म्हणाला की, आसाराम आपल्या सर्व पुरुष सेवेकऱ्यांना एक खास प्रकरची जड़ी-बूटी द्यायचा. जी त्यांना नामर्द बनवायची. सेवेकऱ्यांना तुमचे शरीर अधिक बलशाली होईल, असे सांगून ही जडीबुटी खाऊ घातली जायची. प्रत्यक्षात मात्र जड़ी-बुटीमध्ये नपुंसक बनवण्याचे औषध मिळसलेले असायचे. जेणेकरून आश्रमातील तरुणींवर त्यांची नजर पडू नये. 

 

आसाराम भक्तांना द्यायचा नपुंसक बनवण्याचे औषध

- शिवनाथ नावाचा सेवेकरी म्हणाला होता की, हे नपुंसक बनवण्याचे औषध पुरुष सेवेकऱ्यांची कामवासना कमी व्हावी आणि आश्रमात येणाऱ्या तरुणींवर त्यांची नजर पडू नये म्हणून खाऊ घातले जायचे. 
- विशेष बाब ही की, आज आसाराम स्वत: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याचे आणखी दोन साथीदार शिल्पी आणि शरतचंद्रला 20-20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
- तथापि, पीडितेच्या वडिलांनीही म्हटले की, आश्रमात पुरुष सेवेकऱ्यांची कामवासना कमी करण्यासाठी त्यांना जडीबुटी खाऊ घातली जायची.
- त्यांचे मते, सेवेकऱ्यांना केळीच्या झाडाच्या मुळाचा रस पाजतला जायचा.

 

स्वत: लैंगिक शक्तिवर्धक औषधे घ्यायचा आसाराम
- वास्तविक, माजी सेवेकऱ्याने आरोप केला होता की, आसाराम स्वत: लैंगिक शक्तिवर्धक औषधे घ्यायचा.
- त्याचे मते, जी पंचेड जडी-बूटी घेत असल्याचे आसाराम म्हणाला, ती एक प्रकारचे औषध आहे जे अफू आणि इतर जडीबुटींनी तयार केले जायचे. 
- खरे तर पंचेड़ बूटी आसारामचा कोडवर्ड होता, जी आश्रमाची वैद्य नीता तयार करायची.

 

आसारामवर आरोप अतिशय गंभीर होते
- जेथे लाखो लोकांची श्रद्धा निगडित असते, त्याचा गुन्हा सर्वात जास्त गंभीर मानला जातो.
- ज्याच्या संरक्षणात अल्पयीन राहते, तोच जर शोषण करत असेल तर गुन्हा आणखी गंभीर बनतो.
- बचाव पक्षाचा जोर सज्ञान सिद्ध करण्याचा होता, त्यांना त्यात यश मिळाले नाही.
- पीड़ितेच्या वडिलांवर 50 कोटींची मागणी केल्याचा आरोप, 2008 पासून सिद्ध झाला नाही.
- खटल्या 3 मुख्य साक्षीदारांपैकी दोघांचा मृत्यू झाला आणि एकाच्या हत्येचा प्रयत्न झाला.

 

यानंतरही तुरुंगातून सुटकेची शक्यता कमी, कारण...
- पॉक्सो अॅक्ट 2012 मध्ये अल्पवयीन मुलीची वय 16 ते 18 झाले, पीड़िता 17व्या वर्षात होती.
- द क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 2013 मध्ये बलात्काराची परिभाषा बदलण्यात आली, यामुळे 376 लागले.
- कलम असे, की कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होईल, जन्मठेपेचीही शक्यता.
- 10 वर्षांची शिक्षा झाल्यास 6 महिन्यांत पॅरोलचा हक्कदार, शिक्षेचा उद्देश अपयशी होईल.
- गुजरात जेलमध्ये ट्रान्सफर होईल, तेथे ट्रायल पेंडिंग असल्याने बाहेर येण्याची शक्यता कमीच.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज व फॅक्टस... 

बातम्या आणखी आहेत...