आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 वर्षाची झाली श्रद्धा कपूर, पाहा तिचे लहानपणापासूनचे काही निवडक PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा कपूर 31 वर्षाची झाली आहे. 3 मार्च 1987 ला मुंबई येथे झाला. आभिनेता शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची ती मुलगी आहे. श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूर आहे. त्याने 'शूटआउट अॅट लोखंडवाला' (2007)मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला आहे. श्रद्धा कपूरने आपले शालेय शिक्षण  जमनाबाई नसरी स्कुल आणि अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून घेतेले आहे. 


फिल्मसाठी सोडले शिक्षण...
वृत्तानुसार, श्रद्धाला सुरूवातीपासूनच अभिनेत्री बनायचे होते. ग्रॅज्यूएशनसाठी तिने बोस्टन युनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता, परंतु या दरम्यानच प्रोड्यूसर अंबिका हिंदुजा यांच्याकडून तिला 'तीन पत्ती' या फिल्मसाठी साइन करण्यात आले. यामुळे श्रद्धाने शिक्षण अर्ध्यातच सोडले. 'तीन पत्ती'मध्ये तिने एका कॉलेज गर्लची भूमिका केली होती. या फिल्ममध्ये अमिताभ बच्चन, आर माधवन आणि बेन किंग्सले यांच्या महत्यवाच्या भूमिका होत्या.


'आशिकी 2' ने बनवले स्टार...
श्रद्धा कपूरने 'तीन पत्ती' (2010)नंतर दिग्दर्शक पुनीत मल्होत्राची फिल्म 'लव का द एंड' (2011) केली होती. तेव्हा याशराज यांच्यासोबत आणखी दोन फिल्मचा करार झाला होता. यात एक अर्जून कपूर स्टारर 'औरंगजेब' ही देखील होती. परंतु,  विशेष प्रोडक्शनने तिला 'आशिकी 2'साठी अप्रोच केले तेव्हा श्रद्धाने यशराजसोबतचा करार तोडला. मोहित सुरू ने निर्देशीत केलेल्या फिल्मने एका रात्रीत श्रद्धाला स्टार बनवले. यानंतर तिने एक विलेन' (2014), 'हैदर' (2014), 'ABCD 2' (2015), 'बागी' (2016), 'हाफ गर्लफ्रेंड' (2017), 'हसीना पारकर' (2017) या फिल्ममध्ये काम केले.   


या आहेत अपकमिंग फिल्मस्....
श्रद्धा कपूरच्या अपकमिंग फिल्ममध्ये 'नवाबजादे', 'बत्ती गुल मीटर चालू', 'स्ट्रीट' आणि 'साहो' या फिल्मचा समावेश आहे. साहो सोडून इतर सर्व फिल्म याच वर्षी रिलिज होणार आहे. साहो 2019 मध्ये प्रदर्षीत होईल.


पुढील स्लाइडवर पाहा श्रद्धाचे लहानपणापासूनचे निवडक फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...