आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी हिंदु नाही असे म्हणणारे अमित शहा स्वतः हिंदु नसून जैन धर्माचे, सिद्धरमैयांचा हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - कर्नाटकच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढत असल्याचे दिसत आहेत. त्यात यावेळी कर्नाटकच्या निवडणुकीतही धार्मिक आणि जातीय अस्मितेला मोठा मुद्दा केले जात आहे. त्याचाच प्रत्यय भाजप आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या भाषणांमधूनही येत आहे. एकमेकांवर धार्मिक अस्मितेवरून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्यावर भाजपकडून सध्याला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात येत आहे. विशेषतः भाजपाध्यक्ष अमित शहा हे सिद्धरमैय्या यांच्यावर वारंवार हिंदुविरोधी असल्याची टीका करत आहेत. धार्मिक अस्मितेवरून चांगलेच युद्ध सुरू आहेत. त्यावर आता सिद्धरमैय्या यांनी पलटवार केला आहे. 


काय म्हणाले सिद्धसमैय्या...
मी हिंदु नसल्याची टीका करणारे भाजपाध्यक्ष अमित शहा हे स्वतः हिंदु धर्माचे नसून जैन आहेत. ते कदाचित हिंदु धर्माचे पालन करतही असतील. पण ते जर हिंदु असतील तर त्यांनी स्वतः समोर येऊन सांगावे की ते जैन नसून हिंदु आहेत. 


गुजराती जैन कुटुंबात जन्म 
अमित शहा यांचा जन्म गुजराती जैन कुटुंबात झालेला आहे. विशेष म्हणजे अमित शहांचा जन्म हा मुंबईत झालेला आहे. पण जैन कुटुंबात जन्म झालेला असला तरी अमित शहा नेहमी हिंदुत्वाबद्दल बोलत असतात. त्यामुळे सिद्धरमैय्या यांनी नेमका हा मुद्दा हाती घेतला आहे.  

 

 

बातम्या आणखी आहेत...