आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धरामय्यांचे सरकार घोटाळेमुक्त : राहुल; भाजपने भ्रष्टाचारात विश्वविक्रम केल्याची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोप्पल- भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यमान सिद्धरामय्या सरकार घोटाळेमुक्त असल्याची स्तुती केली. भाजप सरकारने भ्रष्टाचारात विश्वविक्रम मोडल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल यांनी शनिवारी लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी एका मंदिरात पूजा केली. त्यानंतर रविवारी उत्तर कर्नाटकात पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली.  


राहुल म्हणाले, राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा एकामागोमाग एक घोटाळे उघड होत होते. गेल्या पाच वर्षांत एकही घोटाळा झाला नाही. भाजपच्या काळात खाण क्षेत्रापासून विविध क्षेत्रांत घोटाळे झाले. राहुल यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनाशीर्वाद यात्रा काढली आहे. निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे मतदारांनी काँग्रेस पक्षाला आणि सिद्धरामय्या यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  राहुल यांनी विशेष बसद्वारे ही यात्रा काढली आहे. त्यांच्यासमवेत विविध राज्यांचे नेते आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पक्ष कार्यकर्ते व नागरिकांमधून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  

 
राहुल यांनी कर्नाटकातील मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करत नरेंद्र मोदींवर िनशाणा साधला. भाजपने त्यांच्या सरकाच्या काळातील ट्रॅक रेकॉर्ड पाहावे. भाजप सरकारने २००८ ते २०१३ पर्यंत बी. एस. येदियुरप्पा, सदानंद गौडा व जगदीश शेट्टर हे तीन मुख्यमंत्री दिले आणि त्यांच्या चार मंत्र्यांना तुरुंगात जावे लागल्याने राजीनामा द्यावा लागला. असे असताना मोदी येथे येऊन भ्रष्टाचारावर आमच्याविरुद्ध बोलत आहेत. राज्यातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराचा विश्वविक्रम मोडल्याचा आरोपही राहुल यांनी सभेत केला.  

 

कर्नाटकात १८% लिंगायत मतदार, राहुल यांच्या यात्रेस त्यांच्या मठापासून सुरुवात  
राहुल यांनी शनिवारी गुजरातच्या मंदिर दर्शनाचा फॉर्म्युला कर्नाटकातही वापरला. त्यांनी दौऱ्याची सुरुवात कोप्पल जिल्ह्यात लिंगायत समाजाच्या हुलीगेमा मंदिरापासून केली. सायंकाळी सिद्धेश्वरा मठात गेले. बेल्लारीच्या होसपेटमध्ये राहुल यांनी एका यात्रेस हिरवी झेंडी दाखवली व सभा घेतली. राहुल चार दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...