आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी तस्करी केस : सिंगर दलेर मेहंदी दोषी, 2 वर्ष कैदेची शिक्षा, 20 मिनिटात जामीन मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा- लोकांना परदेशात पाठवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पॉप गायक दलेर मेहंदीला पतियाळा कोर्टाने दोषी ठरवत २-२ वर्षांची कैद सुनावली. दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी एक-एक हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. १४ वर्षांपर्यंत लांबलेल्या खटल्यात न्यायाधीश सैनी यांनी शुक्रवारी शिक्षेची घोषणा केली. यानंतर केवळ दहाच मिनिटांत दलेर मेहंदीची ४० हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

 

काय होता आरोप ? 
- दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेरवर आरोप होता की त्यांनी काही लोकांना आपल्या टीममध्ये असल्याचे सांगून बेकायदेशीररित्या विदेशात घेऊन गेले होते. यासाठी ते मोठी रक्कम घेत होते. हे प्रकरण 1998 ते 2003 दरम्यानचे आहे. 

 

दलेरचे नाव कसे आले समोर? 
- दलेरचा भाऊ शमशेर मेहंदी याच्याविरोधात सप्टेंबर 2003 मध्ये एफआयआर दाखल झाला होता. शमशेर हा दलेरचा मोठा भाऊ आहे. पोलिस चौकशीत दलेर मेहंदीचे नाव समोर आले. त्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2003 मधील या प्रकरणात 15 वर्षानंतर कोर्टाने निर्णय दिला आहे. 

 

काय केले होते दलेर आणि त्याच्या भावाने?
- असा आरोप आहे की दलेर मेहंदी आणि त्याच्या भावाने 1998 आणि 1999 दरम्यान अमेरिकेत दोन शो केले होते. ते जेव्हा भारतात परत आले तेव्हा त्यांच्या टीमचे 10 मेंबर हे अमेरिकेतच राहिले होते. 
- एकदा एका अभिनेत्रीसोबत अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या दलेरने तीन मुलींना सॅन फ्रांन्सिस्को येथे सोडले होते. 
- ऑक्टोबर 1999 मध्ये दोघे भाऊ काही कलाकारांसोबत अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांनी तीन मुलांना न्यूजर्सीला सोडले होते. 

बातम्या आणखी आहेत...