आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोहतक - हरियाणवी सिंगर ममता शर्मा (40) मृत्यूचे गुढ उकलले आहे. ममताला घरी येऊन गोहानासाठी घेऊन निघालेला मोहित यानेच ममताची हत्या केल्याचे पोलिस आयुक्त पंकज नैन यांनी सांगितले आहे. मोहित आणि त्याचा मित्र संदीप यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त नैन यांनी सांगितले, 'रविवारी 14 जानेवारीला ममता आणि मोहित एकत्र निघाले होते. दोघांमध्ये भांडण झाले. मोहितने ममतावर चाकूने वार केला. त्यानतंर संदीपला सोबत घेऊन ममताच्या डेडबॉडी एका शेतात फेकून दिली. गाडीत रक्ताचे डाग होते. ते त्याने धुतले.' गुरुवारी (18 जानेवारी) ममताची डेडबॉडी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या गावात - बहियानी येथील एका शेतात सापडला होता.
- ममताचा खून केल्यानंतर मोहितने एक बनावट कथा रचली आणि ममताचा मुलगा भारत (20) याला फोन करुन माहिती दिली. जी कहाणी मोहितने सांगितली तिच त्याने पोलिसांना सांगितली होती.
- भारतने पोलिसांना सांगितले होते, की रविवारी सकाळी साडे आठ वाजता दोघे गोहाना येथील नंदीशाला येथे मकर संक्रातींच्या कार्यक्रमासाठी निघाले होते.
मोहितने भारतला काय सांगितले होते...
- मोहितचा भारतला फोन आला होता. त्याने सांगितले, की ममता शर्मा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसऱ्या गाडीतून गेली, ती थेट कार्यक्रम स्थळी येणार होती. मात्र ती कार्यक्रम स्थळी पोहोचली नाही तेव्हा मोहितने भारतला फोन करुन ही माहिती दिली. कुटुंबियांनी सोमवारी दिवसभर ममताचा शोध घेतला, परंतू ती कुठेच सापडली नाही. तिचा फोनही बंद येत होतो. यानंतर सोमवारी प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
- भारतने सांगितल्यानुसार, सोमवारी फोन केला तेव्हा रिंग जात होती मात्र फोन कोणी उचलला नाही. भारतने ही माहिती पोलिसांना दिली. यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा भारतचा आरोप आहे.
- गुरुवारी ममताचा मृतदेह बलियाना गावाजवळील एका शेतात सापडला. हे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे गाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ममता शर्माची गळा चिरून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर तिचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. ममता कलानौर गावात राहात होती.
पुढील स्लाइडमध्ये, एम.ए. म्यूझिक केल्यानंतर सुरु केले होते स्टेज शो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.