आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Brutal:जन्मानंतर 6 तासांतच या गोजीरवाण्या परीला फेकून दिले, लोकांनी वाचवला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलंधर (पंजाब) - येथे एका रिकाम्या प्लॉटमध्ये 6 तासांपूर्वी जन्मलेली नवजात चिमुरडी सापडली आहे. लोकांनी रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर भिंतीच्या पलिकडे पाहिले तर झाडा झुडुपांमध्ये आणि घाणीमध्ये चिमुरडी उघड्या अवस्थेत पडलेली असल्याचे दिसून आले. गावच्या सरपंचांनी प्लॉटमध्ये लावलेले कुलूप तोडले आणि मुलीला तेथून वाचवून सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर चिमुरडीला जलंधर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. ही चिमुरडी अवघ्या 6 तासांपूर्वी जन्माला आली होती, असे सांगण्यात येत आहे. उपचारानंतर या चिमुरडीला चाइल्ड वेल्फेअर कमिटी (सीडब्ल्यूसी) च्या निगराणीत बालगृह किंवा अनाथ आश्रमात पाठवले जाईल. 


मुलीला घेऊ शकता दत्तक 
जर कोणाला या चिमुरडीला दत्त घ्यायचे असेल तर त्याला अर्ज करता येईल असे सांगण्यात आले आहे. व्हेरीफिकेशननंतर अर्जदार पात्र ठरला तर पुढील प्रक्रिया केली जाईल. अर्जदार सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीकडेही ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...