आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Family Suicide: आणखी एका कुटुंबाची आत्महत्या, फ्लॅटमध्ये 5 तर अपार्टमेंटखाली सापडला 6 वा मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारीबाग- दिल्लीपाठाेपाठ झारखंडमध्येही एकाच कुटुंबातील सहा जणांच्या सामूहिक मृत्यूचे प्रकरण समाेर अाले अाहे. हजारीबाग शहरातील एका फ्लॅटमध्ये रविवारी ६ जणांचे मृतदेह संशयास्पदरीत्या अाढळले. मृतांमध्ये दाेन पुरुष, दाेन महिला व दाेन मुलांचा समावेश अाहे. घटनास्थळी ६ पाकिटे व सहा सुसाइड नाेट सापडल्याचे पाेलिसांनी सांगितले. यात कर्जबाजारी झाल्यामुळे जीवनयात्रा संपवत असल्याचा उल्लेख अाहे. मात्र हे प्रकरण अात्महत्याच अाहे की हत्या, याचा पाेलिस बारकाईने तपास करत अाहेत.

 

महावीर माहेश्वरी (७०), त्यांची पत्नी किरणदेवी (६५), मुलगा नरेश अग्रवाल (४०), त्याची पत्नी प्रीती (३८), नरेशचा मुलगा अमन (१०) व मुलगी अन्वी (८) अशी मृतांची नावे अाहेत. 


महावीर व किरणदेवी यांचे मृतदेह खाेलीत लटकलेल्या अवस्थेत सापडले. प्रीतीचा मृतदेह पलंगावर हाेता, तर अन्वीला विष दिल्याचा तर अमनचा गळा घाेटल्याचा संशय अाहे. नरेशचा मृतदेह अपार्टमेंटच्या खाली सापडला. सुसाइड नाेटमध्ये लिहिले अाहे, 'कर्जाच्या अाेझ्याखाली अाम्ही दबलाे अाहाेत. अाजारपणही अाहे. पैसे परत करता येत नसल्याने बदनामी हाेत अाहे. त्यामुळे अात्महत्या करत अाहाेत.' मात्र पाेलिसांच्या मते, इतक्या उंचीवरून पडल्यानंतरही नरेशच्या मृतदेहातून रक्त अालेले दिसले नाही. गळफास अवस्थेतील महावीर यांचे पाय पलंगापर्यंत पाेहाेचले हाेते. 


५० लाख रुपये अडकले हाेते
अपार्टमेंटच्या खाली नरेशचा मृतदेह पाहून शेजारी त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले. दार उघडेच हाेते. अात जाऊन पाहिले तर पाच जणांचे मृतदेह दिसले. देवेशने सांगितले, नरेशचे ५० लाख रुपये मार्केटमध्ये अडकले हाेते, ते परत मिळत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज वाढले हाेते. 


गणिताच्या फाॅर्म्युल्यात लिहिली सुसाइड नाेट 
सुसाइड नाेटमध्ये लिहिले हाेते, अाजारपण + दुकान बंद + दुकानदारांची थकबाकी + बदनामी + कर्जाचा ताण = मृत्यू. तर लिफाफ्यांवर लिहिले हाेते, अमनला गळफास देऊ शकत नाही म्हणून त्याची हत्या केली. 


नरेश वैफल्यग्रस्त 
हे कुटुंब अनेक वर्षांपासून हजारीबागमध्ये राहत हाेते. शुभम अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट हाेता. त्यांचा मुलगा नरेशचा ड्रायफ्रुट्सचा व्यापार हाेता. ताे खूप नैराश्यात हाेता. नरेशवर रांचीमध्ये उपचारही केले जात होते. 

बातम्या आणखी आहेत...