आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • वय फक्त 6 वर्षे, एका दिवशी बापाने विश्वासात घेऊन विचारल्यावर कळली धक्कादायक हकिगत.. Six Year Old Boy Allegedly Molested And Abused By His Friends Father Recorded Video

Shocking: वय फक्त 6 वर्षे, एका दिवशी बापाने विश्वासात घेऊन विचारल्यावर कळली धक्कादायक हकिगत..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - आंध्र प्रदेशात 6 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. या बालकापेक्षा वयाने मोठे 2 शेजारी मित्र मागच्या दोन महिन्यांपासून त्याचे लैंगिक शोषण करत होते. बालकाने आपल्या वडिलांना चौकशीत आपबीती सांगितली, ज्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांना ताब्यात घेतले आहे.

 

2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्या ठरल्या नरकयातना   
- ही घटना नेल्लोर जिल्ह्यातील आहे. येथे उन्हाळी सुट्यांदरम्यान एप्रिलपासून अमित (बदललेले नाव) च्या लैंगिक शोषणाला सुरुवात झाली. अमितचे वडील म्हणाले की, ते सकाळी 8 वाजता ऑफिससाठी निघून जायचे आणि संध्याकाळी उशिराच घरी परतायचे. दुसरीकडे, बालकाची आई घरकामात आणि त्याच्या लहान भावाच्या देखभालीत व्यग्र होऊन जायची. त्यादरम्यान अमित त्याच्या घराच्या एका मजल्याखाली राहत असलेल्या दोन मुलांसोबत खेळायला जाऊ लागला. मुलाला खेळायला सवंगडी भेटल्याने आईही खुश होती. परंतु काही काळानंतर अमितच्या वर्तणुकीत बदल दिसू लागला. तो सारखा उदास राहू लागला.

 

एवढा हादरला होता चिमुरडा
- वडील म्हणाले की, तो छोट्या-छोट्या गोष्टींवरून तो चिडत होता. अनेकदा त्याने घरातील प्लेटही फोडल्या. खरेतर अमित खूप शांत आणि खेळकर मुलगा होता. वडील म्हणाले की, अनेकदा तो त्यांना ऑफिसात जाऊ देत नव्हता. पूर्वी तर स्वत: मला गाडीपर्यंत सोडून बाय करत होता. आधी मी ऑफिसमधून घरी परतायचो, तेव्हा तो मला दिवसभरात काय-काय केले ते सांगायचा. पण आता अचानक सर्वकाही बदलले होते. त्याला ना भेटायचे होते, ना काही बोलायचे होते. त्याचातला हा बदल पाहून मी खूप भ्यायलो होतो.

 

बापाने जवळ घेताच फुटला अश्रूंचा बांध
- वडील म्हणाले की, त्याला काही ना काही त्रास जरूर आहे, पण तो मोकळेपणाने सांगू शकत नाही. एका दिवशी रात्री मी त्याला विचारायचा पुन्हा प्रयत्न केला की, तुला काय त्रास आहे? मी तुझा सर्वात चांगला मित्र आहे आणि तू मला काहीही सांगू शकतोस. एवढे बोलताच त्याचा अश्रूंचा बांध फुटला. त्याने मला घट्ट आवळले आणि सांगितले की, ''मी ज्यांच्यासोबत खेळतो, ते माझ्यासोबत घाण काम करतात. त्यांना जेव्हाही संधी मिळते, तेव्हा ते असे कृत्य करतात.''
- अमितच्या वडिलांना कळले की, त्यांचा मुलगा लैंगिक शोषण अन् रेपची शिकार ठरत आहे. खालच्या फ्लोअरवर राहणारी ही दोन अल्पवयीन मुले त्याला धमकावतसुद्धा होती की, तू जर कुणाला याबाबत काहीही सांगितलेस तर तुझ्या कुटुंबाचे बरेबाईट होईल. 6 वर्षांचा हा चिमुरडा मागच्या 2 महिन्यांपासून याच तणावातून जात होता.

 

पोलिसांत तक्रार दाखल
यानंतर अमितच्या वडिलांनी नेल्लोर पोलिसांना याप्रकरणाची तक्रार दाखल केली आणि पोलिस चीफना मुलाची व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवली. ज्यात तो बोलत होता की, त्याला कशाप्रकारे सेक्शुअली अॅब्यूज केले गेले. वडिलांनी आपल्या मुलाची पूर्ण आपबीती फोनमध्ये मुद्दाम रेकॉर्ड केली, कारण त्याला सारखे-सारखे त्याबाबत बोलताना त्रास होऊ नये. दुसरीकडे, दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांपैकी एकाच्या वडिलांनी अमितच्या वडिलांना माफ करण्याची विनंती केली, परंतु अमितच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...