आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीअर पिऊन लग्नात पोहोचला तरुण, 6 वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - लग्न सोहळ्यातून एखा चिमुरडीला फसवून डोंगरावर नेऊन बलात्कार आणि हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणाचे नाव जीतेंद्र कुशवाह आहे. 23 वर्षीय जीतेंद्र पीडितेच्या मावशीच्या घरी लग्नामध्ये आमंत्रण नसतानाही जेवणासाठी घुसला होता. त्याआधी त्याने बीअर प्यायली होती. त्याच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 


भावांकडे जायचे सांगून नेले मुलीला.. 
जीतेंद्रने पाण्याच्या स्टॉलजवळ उभ्या असलेल्या 6 वर्षीय चिमुरडीला तिचे भाऊ बोलवत असल्याचे सांगून फसवून बाहेर नेले. डोंगरावर नेऊन त्याने बलात्कारानंतर गळी दाबून तिची हत्या केली. लग्नात आलेल्या संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर त्यांना आरोपीबाबत माहिती मिळाली.  


अनेक लग्नांत विनाबोलावता पोहोचतो.. 
सीसीटीव्हीतील तरुण दिसल्यानंतर पोलिसांनी 10 हजारांचे बक्षीस जाहीर केले. त्यानंतर लगेचच त्याची माहिती मिळाली. पोलिसांना समजले की जीतेंद्र अशाप्रकारे अनेक लग्नांमध्ये न बोलावता पोहोचत असतो. सुरुवातीला त्याने गुन्हा मान्य केला नाही. पण नंतर पोलिसांच्या प्रश्नाच्या जाळ्यात अडकून त्याने कबुली दिली. 


आइस्क्रीमचा चमचाही पुरावा 
पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी सकाळी घरातून अटक केली. त्याने कबुली देत सर्वकाही सांगितले. मुलगी भावांना शोधत होती. तो डाव साधत त्याने मुलीला सोबत नेले. झुडपांत मुलीवर बलात्कार केला. ती बेशुद्ध झाली होती. काहीवेळाने शुद्ध आल्यानंतर ती पळून जाऊ लागली. त्यानंतर त्याने तिचा गळा आणि तोंड दाबून तिला मारून टाकले. त्यानंतर तो पुन्हा लग्नाच्या ठिकाणी आला. रात्रभर तो स्टेजच्या मागे झोपला होता. पहाटे 5 वाजता तो घरी गेला. पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळला त्याठिकाणी आईस्क्रीमचा चमचा आणि माळेचे मणीही सापडले. 


जॅकेट फेकले 
आरोपीने घरी जाण्यापूर्वी त्याकडे असलेले जॅकेट फेकून दिले. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने ते फेकले. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डागही आढळले. ते तपासणीसाठी पाठवले आहेत. 


कुटुंबीय म्हणाले, आमच्या ताब्यात द्या.. 
पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला अटक झाल्याचे समजताच पोलिसांकडे जात त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. आमच्या निरागस मुलीची त्याने अशी अवस्था केली. त्याला सोडणार नाही. दहा मिनिटे त्याला आमच्याकडे द्या मग आम्हाला हवं तर फासावर लटकवा, असे कुटुंबीय म्हणाले. संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर हल्ला केला, तसेच त्याची बर्फाच्या गोळ्याची गाडीही जाळली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...