आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयातील प्रेमींच्या प्रेमाचा करुण अंत, फाशी घेण्यापूर्वी त्या दोघांनी काढली सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - ती किशोरवयीन तरुणी दहावीमध्ये शिकत होती आणि 11 वीतील एका तरुणावर तिचे प्रेम जडले होते. दोघे एकाच भागात राहत होते. पण वस्ती वेगवेगळी होती. त्यांच्या प्रेमाला फार मोठा काळही लोटला नव्हता पण त्या दोघांनी एका झाडाला फाशी घेत स्वत:चे जीवन संपवले. मरण्यापूर्वी दोघांनी   एक सेल्फी घेतली आणि व्हॉट्सअपवर टाकली. 


घरून पळून गेली होती तरुणी 
व्यारा तापी जिल्ह्यातील डोलवणमध्ये तरुणी आधी मैत्रिणींबरोबर पेलाडवाणीहून तिच्या मामाच्या घरी अंधारवाडीला गेली. त्याठिकाणाहून ती 20 मे रोजी तिचा प्रियकर कौशल कुमार चौधरीबरोबर बाइकवर कुठेतरी निघून गेली. खूप वेळ ती परतली नाही तेव्हा कुटुंबीयांनी त्याची सूचना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. त्यानंतर 23 मे रोजी बामणामाल गावाजवळ दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोघांनी आत्महत्येसाठी नायलॉनच्या दोरीचा वापर केला. 


मरण्यापूर्वी घेतली सेल्फी 
दोघांनी सुसाइडपूर्वी एक सेल्फी घेतली आणि ती व्हॉट्सअपवर टाकली. हा फोटो व्हाट्सअपवर पाहिल्यानंतर त्यांच्या ओळखीच्या लोकांना याबाब समजले. घटनास्थळी दोघांच्या चपला आणि बाइकही आढळली. 


3 दिवस लटकत होते मृतदेह 
दोघे 20 मे रोजी बेपत्ता झाले होते. 23 मे रोजी त्यांचे मृतदेह आढळले. त्यामुळे पोलिसांनी असा अंदाज लावला की 3 दिवस त्यांचे मृतदेह लटकत राहिले असावे. पोलिसांना अद्याप दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून ते नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...