आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Smart City Test Big Cities Gain Only Passing Marks Pune Gets 5 And Bengaluru Got 3 Points

स्मार्ट सिटी टेस्टमध्ये मोठी शहरे काठावर पास, पुणे टॉपवर तर बेंगळुरू शेवटच्या स्थानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार गेल्या चार वर्षांपासून स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी झटत आहे. पण देशातील बहुतांश शहरे स्मार्ट सिटीच्या परीक्षेत काठावर पास होत आहेत. कोणत्याही शहराला 60% टक्के गुणही मिळाले नाही. बेंगळुरूच्या सेंटर फॉर सिटिझनशिप अँड डेमोक्रॅसीच्या वार्षिक इंडियाज सिटी सिस्टम-2018 सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. 54% शहरी प्रशासन म्हणजे महानगरपालिकांची तर कर्मचाऱ्यांना पगार देता येईल एवढीही कमाई नाही. अनेक ठिकाणी 35% हून अधिक पदे रिक्त आहेत. कत्याशिवाय येथील अधिकारी आणि आयुक्तांचा सरासरी कार्यकाळही 10 महिन्यांचा आहे. 
 
20 राज्यांचा समावेश 
- या सर्वेक्षणात 20 राज्यांच्या 23 शहरांनी सहभाग घेतला. यात शहर प्रशासनाशी संबंधित नियम, कायदे आणि संस्थात्मक प्रक्रियेनुसार शहरांना रेटिंग देण्यात आली.  
- शहरांच्या बाबतीत सध्या पुणे पहिल्या क्रमांकावर तर बेंगळुरू सर्वात अखेरच्या स्थानी आहे. 
- 10 पैकी पुण्याला 5.1 गुण मिळाले. तर बेंगळुरुला फक्त 3 गुण मिळाले. दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. 5 पेक्षा अधिक गुण कोणत्याही शहराला मिळाले नाहीत. 
 
सर्वेक्षणात हेही आले समोर 
1. पाच वर्षांत बदलले सहा आयुक्त 
- रिपोर्टनुसार गेल्या पाच वर्षांत पुणे, भुवनेश्वर, सूरतमध्ये तीन आयुक्त बदलले गेले. 
- तिरुअनंतपुरममध्ये पाच वर्षात सहा आयुक्त बदलले गेले. तर पाटणामध्ये 5 पेक्षा अधिक आयुक्त राहिले. देहरादूनमध्येही सहापेक्षा अधिक तर चेन्नई, बेंगळुरू आणि चंदिगजमध्ये चार आयुक्त बदलले गेले. 
 
2. महापौराचा कार्यकाळही 1 वर्षाचा 
- महापौरांचा कार्यकाळ हीदेखिल एक मोठी समस्या आहे. 
- दिल्ली, बेंगळुरु, चंदिगडसारख्या शहरांत महापौरांचा कार्यकाळ एका वर्षाचा आहे. त्यामुळे दिल्लीच्या विकासावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. 
- दिल्लीमध्ये तीन महापालिका आहेत. याठिकाणी दरवर्षी महापौरांची निवडणूक होते. त्यात दोन महिने जातात. तर महापौरांना काम समजून घ्यायला तीन महिने लागतात. सहा महिन्यात जेवढ्या फाईल्स पुढे जातात, त्या अनेकदा नवीन महापौर आले की रद्द करतात. 
 
पाच मोठी आव्हाने 
- सार्वजनिक ठिकाणांचे आधुनिक पद्धतीने नियोजन 
- उत्पन्नाच्या साधनांची कमतरता 
- कौशल्यवान कर्मचाऱ्यांची कमतरचा 
- अधिकारहीन महापौर, प्रशासन आणि सरकारी संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव 
- लोकांचा सहभाग कमी असणे, पारदर्शकतेची कमतरता 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, टॉप फाइव्ह आणि बॉटम फाइव्ह शहरांचा स्कोर.. आणि जगातील टॉप शहरांचा स्कोर..  
 
 
बातम्या आणखी आहेत...