आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपलेल्या युवकाला सर्पाने केला दंश, त्यानंतर सापाचे झाले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरबा (छत्तीसगड) - येथील युवकाला सापाने दंश केल्यानंतर स्थानिकांच्या सांगण्यावरुन कुटुंबियांनी सापाला पकडले. त्यांचे म्हणणे होते की साप त्यांच्या ताब्यात राहिला तर युवक लवकर बरा होईल. दंश झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात साप राहिल्यानंतर त्याचे विष शरीरात पसरत नाही अशी येथील स्थानिकांची मान्यता आहे. दरम्यान, काही लोकांनी तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.  

 

काय आहे प्रकरण 
- सर्पदंशाची घटना कोरबा जिल्ह्यातील दीपका पोलिस स्टेशन अंतर्गत गावात घडली आहे. शनिवारी रात्री 30 वर्षांच्या अवध राम याला सापाने दंश केला. 
- सर्पदंशाने झोपमोड झालेल्या अवध रामने पाहिले की त्याच्या खाटेजवळ एक साप आहे. साप पाहिल्यानंतर तो जोरजोरात ओरडायला लागला. त्याचा आवाज ऐकून कुटुंबातील लोक जमा झाले. त्यांनी एका जाळीत सापाला पकडले. 
- गावकऱ्यांनी सांगितले की सापाने ज्या व्यक्तीला दंश केला त्याच्या संपर्कात तो राहिला तर त्याचे विष चढत नाही. अशी ग्रामस्थांची मान्यता असली तरी काही लोकांनी तरुणाला शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

बातम्या आणखी आहेत...