आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • शेतकऱ्याला दंश करून सापाने पायाला असा घातला विळखा, पाहून डॉक्टरही झाले चकित Snake Wrapped In Farmer Leg

शेतकऱ्याला दंश करून सापाने पायाला असा घातला विळखा, पाहून डॉक्टरही झाले चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधेपुरा(बिहार) - मधेपुरा जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. येथे एक शेतकरी शेतावर काम करत असताना सर्पाने त्याला दंश केला. दंश केल्यानंतर त्याने शेतकऱ्याच्या पायाला घट्ट विळखा घातला. आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांनी हे पाहून शेतकऱ्याला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी गावकऱ्यांच्या मदतीने सापाची शेतकऱ्याच्या पायावरील कुंडली सोडवली. 

 

शेतकऱ्याला काहीच झाले नाही...
- डॉक्टर म्हणाले की, शेतकऱ्याच्या पायाची कातडी जाड होती. यामुळे सापाने दंश केल्यानंतर त्याचे दात कातडीतच अडकून बसले. यामुळेच साप भ्यायला आणि त्याने पायाला घट्ट विळखा घातला.
- सुदैवाने हा साप बिनविषारी होता. यामुळे शेतकऱ्याला कोणताही धोका निर्माण झाला नाही. शेतकऱ्यावर प्राथमिक उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...