आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Soldier Murdered His Wife Brutally By Inserting Electric Wire In Her Private Part In Raipur Chhattisgarh

जवानाने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये विजेची तार टाकून दिला शॉक, अवैध संबंधांच्या संशयामुळे हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगड आर्म्ड फोर्स (सीएएफ) च्या एका जवानाने कथितरीत्या आपल्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये करंट सोडून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना बालोदबाजार-भाटपारा जिल्ह्यातील आहे. 33 वर्षीय आरोपी सुरेश मिरी याला पोलिसांनी अटक केली आहे. 

 

चारित्र्यावरील संशयाने केली हत्या...
- सूत्रांनुसार, सरगाव येथील रहिवासी सुरेश हा दंतेवाड़ा जिल्ह्यातील सीएएफच्या सहाव्या बटालियनमध्ये कुक म्हणून काम करतो. आरोप आहे की, त्याने चारित्र्यावरील संशयामुळे पत्नीची हत्या केली.


- आरोपी सुरेशने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. त्याने सांगितले, 'बुधवारी पत्नीच्या अवैध संबंधांवरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. रागाच्या भरात मी तिची हत्या केली.'


- सरगाव पोलिस स्टेशनचे एसआय पारसराम जगत म्हणाले, बुधवारी जेव्हा पत्नी लक्ष्मी कपडे धूत होती, तेव्हा सुरेशने तिला बेदम मारहाण करून अर्धमेले केले. यानंतर त्याने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये विजेची तार सोडून शॉक दिला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

 

डेडबॉडी पाहून पत्नीच्या माहेरच्यांना आला संशय
- आरोपीने पोलिसांना सांगितले की, पत्नीच्या हत्येनंतर त्याने सासरच्यांना फोन करून सांगितले की, लक्ष्मीचा आजारपणात मृत्यू झाला आहे. यानंतर एक व्हॅन बुक करून तिची डेडबॉडी आमच्या मूळ गावी खजीरीला नेण्याची तयारी सुरू होती.


- तेवढ्यात, मृत पत्नीच्या माहेरची मंडळीही तेथे आली. त्यांना लक्ष्मीची डेडबॉडी पाहून संशय आला. यानंतर त्यांनी पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी घराला सील करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...