आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CJI विरोधात विरोधकांचा महाभियोगाचा प्रस्ताव, वाचा यापूर्वीची काही प्रकरणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेससह विरोधकांनी महाभियोगाची नोटिस दिली आहे. जज लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाने चौकशीस नकार देत याचिका फेटाळली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर नाराजीही व्यक्त केली होती. काँग्रेसने तर हा काळा दिवस असल्याचेही म्हटले होते. या निकालानंतर विरोधी पक्षांनी महाभियोगासाठीच्या प्रक्रियेचा वेग वाढवला. विरोधी पक्षात असलेल्या सात पक्षाच्या 64 खासदारांनी महाभियोग नोटिसवर सह्या केल्या आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे महाभियोगासंबंधी नोटिस दिली. 


ही नोटिस मंजूर होऊन महाभियोगाची प्रक्रिया सरकली तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची ही पहिलीच वेळ असेल. पण यापूर्वी काही उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या विरोधातमहाभियोग नोटिस देण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे हे आपण जाणून घेणार आहोत. 

 

न्या सौमित्र सेन...
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सौमित्र सेन यांच्याविरोधात 2011 मध्ये महाभियोग चालवण्यात आला होता. राज्यसभेने आर्थिक गैरव्यवहार आणि चुकीची माहिती दिल्याच्या आरोपात त्यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. पण कारवाई सुरू होण्यापूर्वीच सेन यांनी राजीनामा दिला होता. 

 

पुढे वाचा, महाभियोगाच्या इतर काही प्रकरणांबाबत...


 

बातम्या आणखी आहेत...