आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे होते राजीव गांधी, जाणून घ्या खुद्द इंदिरा गांधींनी सांगितलेले किस्से अन् आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती नुकतीच झाली. भारताच्या विकासामध्ये राजीव गांधी यांचा मोलाचा वाटा आहे असे नेहमीच म्हटले जाते. प्रामुख्याने देशात झालेली संगणकीय क्रांती ही राजीव गांधी यांच्यामुळेच घडली असे श्रेयही त्यांना दिले जाते. राजीव गांधी हे अत्यंत हुशार आणि राजकीय दृष्ट्या दूरदृष्टी असलेले नेते होते. हे झाले त्यांच्यामध्ये असलेले राजकीय गुण. पण राजीव गांधी यांचा स्वभाव कसा होता किंवा त्यांना काय आवडत होते, त्यांचे बालपणीचे काही किस्से फारसे आपण ऐकलेले नाही. असेच काही किस्से आपण जाणून घेणार आहोत. इंदिरा गांधी यांनी स्वतः त्यांच्या एका मुलाखतीत या सर्वाबाबत चर्चा केली आहे.  

 
दिखावूपणा आवडत नव्हता
इंदिरा गांधींच्या मते राजीवजींना दिखावूपणा आवडत नव्हता. यासंदर्भातील लहानपणीचा एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. राजीव यांचे लहान भाऊ संजय यांचे लहानपणी टॉन्सिलचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी ऑपरेशन होईपर्यंत राजीव ऑपरेशन थिएटरबाहेर बसून होते. नंतर ते आतमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी संजय गांधी यांची बराच वेळ सेवाही केली. पण तेव्हा संजय गांधी बेशुद्ध होते. जेव्हा संजय यांना शुद्ध आली तेव्हा मात्र राजीव लगेच त्याठिकाणाहून निघून गेले. त्यामुळे त्यांना कोणताही दिखावूपणा आवडत नव्हता असे इंदिरा गांधींनी सांगितले. 

 

पुढे वाचा, राजीव गांधींबाबत असेच काही किस्से..

 

 

बातम्या आणखी आहेत...