आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी मुलानेच चिरला वृद्ध बापाचा गळा, मग फेव्हिक्विकने जोडू लागला मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या घटनेचा Video पाहा शेवटच्या स्लाइडवर... - Divya Marathi
या घटनेचा Video पाहा शेवटच्या स्लाइडवर...

बस्ती - येथे एका हैवान मुलाचे सुन्न करणारे कृत्य समोर आले आहे. आधी तर मुलाने आपल्या वृद्ध बापाचा धारदार शस्त्राने गळा चिरला, मग फेव्हिक्विकने जोडण्याचा प्रयत्न करू लागला. बापाची किंकाळी घराबाहेर जाऊ नये म्हणून मुलाने टीव्हीचा आवाज मोठा केला. पण तरीही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसले तेव्हा गंभीर जखमी बापाला मुलगा घरात बंद करून पळून गेला. 

 

शेवटच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...

 

शेजाऱ्यांनी ऐकला वेदनांनी विव्हळण्याचा आवाज...
ही घटना जिल्ह्याच्या सोनहा परिसरातील दरियापूरमधील आहे. येथील रहिवासी 65 वर्षीय रामदेव मिश्र रेल्वेतून निवृत्त कर्मचारी आहेत. सूत्रांनुसार, शनिवारी रामदेव मिश्र यांच्या विव्हळण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला तेव्हा गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.

 

दृश्य पाहून सर्वच झाले दंग...
घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचलेल्या सरपंचाने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता आतील दृश्य पाहून सर्वच चकित झाले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत रामदेव जमिनीवर पडलेले होते आणि त्यांच्या मानेवर गंभीर जखम स्पष्ट दिसत होती.

 

लगेच हॉस्पिटलमध्ये हलवले...
यानंतर घाई करत रामदेव यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर केले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रामदेव यांनी इशाऱ्यानेच पोलिसांना आपली आपबीती सांगितली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आपल्या पहिल्या पत्नीचीही हत्या केलेली आहे आरोपीने...

बातम्या आणखी आहेत...