आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking : ऑपरेशनसाठी पैसे नव्हते म्हणून घरीच कापला आईचा गँगरीन झालेला पाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - एका मुलाने त्याच्या आईचा पाय घरीच कापल्याचे समोर आले आहे. त्याने असे करण्याचे कारण म्हणजे, त्याच्याकडे आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते. या मुलाच्या आईच्या पायाला गँगरीन झालेला होता. त्यामुळे आईचा पाय कापणे अत्यंत अनिवार्य झालेले होते. 
 
असे आहे प्रकरण 
पंचमहाल जिल्ह्याच्या राजगड गावामधील गुलाब चौहान नावाचा तरुण राज्य परिवहन महामंडळामध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या आईला डायबिटीज झालेला होता. त्यामुळे तिच्या पायाला गँगरीन झाला होता. पायाची जखम बरी होत नसल्याने गुलाब वारंवार डॉक्टरांकडून सल्ला घेत होता. त्यावर डॉक्टर त्याला पाय कापण्याचा सल्ला देत होते. पण गुलाबकडे आईच्या पायाचे ऑपरेशन करून पाय कापण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्याने बरेच प्रयत्न करूनही पैसे जमले नाही. अखेर आईचा जीव वाचवण्यासाठी गुलाबने एक निर्णय घेतला. त्याने घरीच आईचा पाय कापायचे ठरवले. 
 
गुलाब चव्हाणने अत्यंत नाइलाजाने हा निर्णय घेतला होता. पैसे नाहीत आणि आईचा जीव तर वाचायला हवा म्हणून त्याने हा निर्णय घेतला. मदतीसाठी म्हणून त्याने त्याच्या दोन बहिणींनाही बोलावून घेतले. आईच्या पायाच्या ऑपरेशनसाठी आवश्यक असलेले साहित्यही तो घेऊन आला होता. त्याने आईला पलंगावर बसवले आणि बहिणींच्या मदतीने आईचा पाय कापला. त्याचा व्हिडिओदेखिल गुलाबने तयार केला.
 
 

बातम्या आणखी आहेत...