आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या सुंदर तरुणीने 10 वर्षे पोलिसांना असे गंडवले; Sonali 10 Years Stay In Police Mess Indore And Telling Sister Of ADG

या सुंदर तरुणीने 10 वर्षे पोलिसांना असे गंडवले; पोलिस अधिकाऱ्यांमध्ये होता दरारा, अशी झाली पोलखोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - ज्या पोलिसांकडे तक्रार लिहिण्यासाठी जायला सर्वसामान्य कचरतात, तेच पोलिस एक-दोन नाही, तर तब्बल 10 वर्षे फक्त 8वी पास असलेल्या तरुणीच्या रुबाबापुढे दबून राहिले. तिचा रूबाबही असा की, तिच्या सुखसोयींमध्ये थोडाही हलगर्जीपणा झाला, तर टीआयपासून ते सीएसपीपर्यंत सर्व भंडावून जायचे. जेव्हा मनात येईल, ती थेट पोलिस ऑफिसर्सच्या मेसमध्ये जायची. तिचे राहणीमान, अस्खलित इंग्रजी बोलण्याला भुलून इंदूरचे पोलिस अधिकारीच नाही, तर भोपाळ, उज्जैनचे अधिकारीही अडकले आणि तिला व्हीआयपी ट्रीटमेंट देत राहिले. तब्बल एक दशक तिने पोलिसांना आपल्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचवले. या चलाख तरुणीचे दु:साहस एवढे वाढले की, ती पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अर्ज घेऊ लागली. अधिकाऱ्यांच्या येथे होणाऱ्या लग्न-पार्टीजमध्ये ती गेस्ट बनून पोहोचायची. या पाहुणीच्या भोंदूगिरीचा खुलासा झाल्यावर आता अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. आता चौकशी, कारवाई सोबतच तिच्या कॉन्टॅक्ट्सचा शोध घेतला जात आहे.

 

पोलिसांनी सोनाली अन् तिच्या प्रियकराला केली अटक
- तरुणीचे नाव आहे सोनाली शर्मा, ती मूळची भोपाळची रहिवासी आहे. भास्करमध्ये या प्रकरणाच्या खुलाशानंतर पोलिसांनी सोनाली आणि तिचा प्रियकर कृष्णा राठौरला भोपाळमधून अटक केली आहे.
- तो सोनालीसोबत विद्यानगरच्या फ्लॅटमध्ये किरायाने राहायचा. डीआयजी हरिनारायणाचारी मिश्र म्हणाले की, सोनालीचे वडील शेतकरी होते, त्यांचे निधन झालेले आहे. तर तिची आई भोपालमध्ये होशंगाबाद रोडवर राहते.
- प्राथमिक चौकशीत सोनालीने फक्त रूबाब दाखवण्यासाठी असे केल्याचे म्हटले आहे. परंतु तिने या खोट्या ओळखीच्या आधारे काही फसवणूक केली आहे का, याची चौकशी सुरू आहे.

 

एएसपींना आला संशय, मग झाली पोलखोल
- सोनालीवर एएसपी रूपेश द्विवेदी यांना 4 महिन्यांपूर्वी संशय आला होता. त्यांनी डीआरपी लाइनच्या आरआय यांना सूचना देऊन पडताळणी करण्यासाठी सांगितले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.
- सोमवारी ऑफिसर मेसमध्ये इंदूरचे माजी डीआयजी आणि सध्याचे एडीजी एसएएफ पवन श्रीवास्तव यांची एक पार्टी होती. पार्टीत जाण्यासाठी तिने मेसच्या एका जवानाला बोलावून दटावले. 


असा घेतला फायदा : रिटायर्ड डीजीच्या ओळखीवर आली होती
- सोनाली पहिल्यांदा 2008 मध्ये रिटायर्ड डीजी लोकायुक्त कापदेव यांच्या शिफारशीवरून त्यांच्या मुलींसोबत ऑफिसर मेसमध्ये थांबली होती.
- नंतर तिने पोलिस अधिकाऱ्यांशी ओळख बनवली आणि त्यांची नातेवाइक असल्याचे सांगून फायदा उचलला. यानंतर तिचे येणे-जाणे सुरू राहिल्याने मेसचे कर्मचारीही तिला व्हीआयपी पाहुण्यांसारखा सन्मान देऊ लागले.
- तिने काही दिवसांपूर्वी एका रेल्वे एसपींच्या फोनवरूनही रूम बुक केली होती. ती काही दिवसांपूर्वी सीएसपी ज्योती उमठ यांच्या लग्न सोहळ्यात सामील झाली होती.

 

एएसपींनी एसडीओपींची घातली होती भेट
- सोनियांचा तब्बल अडीच वर्षांपूर्वी एका एएसपींनी तत्कालीन बैतूलच्या एसडीओपी ज्योती उमठ यांच्याशी भेट घडवून आणली होती. ते म्हणाले होते की, सोनियाला मुख्यमंत्रीही खूप मानतात.
- साध्वी ऋतंभरा यांची शिष्या आहे आणि विजयवर्गीयही राखी बांधतात. तेव्हापासून ज्योती उमठ आणि सोनियाची ओळख झाली होती. ज्योती या सध्या सीएसपी म्हणून कार्यरत आहेत.


- याबाबत जेव्हा एडीजी अजय शर्मा यांना कळले की, त्यांच्या नावाचा वापर करून कुणीतरी आफिसर मेसमध्ये थांबत आहे, तेव्हा त्यांनी ज्योती उमठ यांना सोनियाकडे पाठवले, कारण त्यांची पूर्वीपासून ओळख होती.
- सोनिया इंदूर मेसमध्ये तत्कालीन एसएएफ आयजी पवन श्रीवास्तव यांच्या रेफरन्सवरून मेसमध्ये थांबली होती. यानंतर तिचा रूबाब वाढला होता.
- कृष्णा राठोर हा तिचा प्रियकरच सीनियर ऑफिसर वा तिचा पीए बनून मेसमध्ये रूम बुक करायचा. सोनिया ही हुजूर तालुक्यातील फंदा गावची रहिवासी आहे.
- सोनिया मागच्या एका वर्षापासून इंदूरमध्ये राहत आहे. कृष्णा राठोडही होशंगाबाद रोडचा रहिवासी आहे. भोपाळ ऑफिसर मेसमधूनही याबाबत माहिती गोळा केली जात आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...