आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता रेल्वेत या 2 ठिकाणी सेल्फी घेतल्यास, 2 हजारांचा दंड, 6 महिने शिक्षेचीही तरतूद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - स्टेशनवर उभ्या असलेल्या रेल्वेच्या समोप किंवा रेल्वेच्या दरवाजावर उभे राहून सेल्फी काढणाऱ्याला आथा 2 हजारांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. जे प्रवाशी अशी चूक वारंवार करतील त्यांना 6 महिन्यांपर्यंतची शिक्षाही होऊ शकते. हा साऊथर्न रेल्वे (दक्षिण) ने सेल्फीमुळे होणारे अपघात थांबवण्यासाठी हा नियम लागू केला आहे. 


कोईम्बतूर जंक्शनपासून दक्षिण रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्टेशन मास्टर्स आणि मॅनेजर्सना यासंबंधीची ऑर्डर पाठवण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते केवळ कॉलेजचे विद्यार्थीच नव्हे तर अनेक विवाहित महिलादेखिल प्रवास अविस्मरणीय व्हावा यासाठी मुलांना कडेवर घेऊन सेल्फी काढच असतात. यापैकी बहुतांश सेल्फी रेल्वेच्या दाराजवळ येऊन घेतले जातात. 


अशा प्रकारांमुळे अनेक लोकांना प्राण गमवावा लागला आहे. हे सर्व थांबनण्यासाठीच रेल्वे पोलिस आणि आरपीएफला सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...