आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्नाटकमध्ये सपा-बसप स्वतंत्रपणे निवडणूक लढणार : राजेंद्र चौधरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ -  उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभा मतदारसंघांत एकत्र येऊन भाजपला पराभवाची धूळ चाखायला लावणाऱ्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने कर्नाटकात मात्र स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. आमची युती फक्त गोरखपूर आणि फुलपूर या उत्तर प्रदेशमधील लोकसभा पोटनिवडणुकीपुरतीच होती.

 

इतर राज्यांत अशा युतीबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, सर्व धर्मनिरपेक्ष दलांनी एकत्र लढावे, अशी आमची इच्छा आहे, अशी माहिती सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दिली.  बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी (जेडीएस) युती केली आहे. बसपा कर्नाटकमध्ये २० जागा लढवत आहे. 

बातम्या आणखी आहेत...